top of page
Product Page: Stores_Product_Widget
Antyeshthi Vidhi Dahava Dashakriya  Vidhi

Antyeshthi Vidhi अंत्येष्टी विधी

Book Asthi Visarjan Dashakriya Vidhi with all puja material at Alandi.
आळंदी अस्थी विसर्जन दशक्रिया विधीसाठी गुरुजी  येथे बुक  बुक करा
Pandit for last rites in Pune, Antyesti Puja, Antim kriya karam and Antim Sanskar Pooja Pune | Shradh Puja & Tarpan Hindu priest in Pune, Maharashtra Dashakriya Vidhi Moksha Sthan Aalandi दशक्रिया विधी मोक्ष स्थान आळंदी
दशक्रिया हा हिंदू चालीरीतींनुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहाव्या दिवशी करण्यात येणारा विधी आहे. व्यक्तीच्या निधनानंतर अस्थिसंचयन करण्यापासून ते दहा दिवसापर्यंत विविध विधी यामध्ये समाविष्ट होतात. त्यामध्ये स्नान, मृत्तिकास्नान, एकपिंडदान, विषमश्राद्ध, वपन, पाच मडक्यांवर पोळ्या, छत्र, पादुका, कावळा शिवणे अशा विविध विधींचा समावेश होतो.
हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मृत्युनंतर दहा दिवस आत्मा पृथ्वीतलावर वास करतो. दहावा विधी केल्यानंतर त्याच्या इच्छा तृप्त न झाल्यास त्याला मुक्ति मिळत नाही. इच्छा राहिल्या नसल्यास दहाव्याच्या भाताच्या पिंडाला कावळा शिवल्यास मुक्ति मिळते, कारण कावळ्याच्या रूपात आत्मा असतो अशी धारणा आहे. परंतु कधीकधी कावळा शिवत नाही अशा वेळेस ब्राह्मण दर्भाचा कावळा स्पर्श पिंडाला करून कावळा शिवला असे मानतात.
दशक्रियेविषयीची खालील आख्यायिका प्रसिद्ध आहे.
एकदा राम वनवासात आरामात झोपले असतांना तेथे एक कावळा येतो आणि तो सीतेला त्रास देत असतो. काही केल्या तो तिचा पिच्छा सोडत नाही. तेव्हा त्रासून सीता रामाला उठवते आणि कावळा कसा त्रास देतो ते सांगते. त्यावेळेस रामाकडे धनुष्यबाण नसतो, म्हणून तो जवळच पडलेली एक गवताची काडी मंत्रून कावळावर फेकतो, तर ती काडी (मंत्रीत दर्भ) कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेते आणि कावळा एका डोळ्याने आंधळा होतो म्हणून त्याला 'एकाक्ष' म्हणतात. त्याच वेळेस सीता त्याला शाप देते की तू एकाक्ष असल्याने तुला सर्वजण अशुभ मानतील, तेव्हा कावळा गयावया करून उःशाप मागतो तेव्हा त्याची दया येऊन सीता त्याला उ:शाप देते की, मनुष्य मृत झाल्यावर त्याच्या दहाव्याच्या पिंडाला तू स्पर्श केल्याशिवाय त्या व्यक्तीचा आत्मा मुक्त होणार नाही, शिवाय ही दर्भाची काडी सुद्धा उपयोगी पडेल.
अयोध्या,मथुरा,माया (हरिद्वार),काशी,कांची,अवंतिका(उज्जयिनी), द्वारका या सर्व मोक्षनगरींचे एकत्रित मोक्षदायक सामर्थ्य श्रीक्षेत्र (अलंकापुरी)आळंदी येथे आहे.श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी ने पुनीत झालेल्या गयातुल्य भूमीवर मृत व्यक्तीचे दहनादि अंत्यसंस्कार करणे हे धर्मशास्त्रानुसार काशीमध्ये मणिकर्णिका घाटावर करण्याइतके महापवित्र आणि मोक्षदायक आहे.आळंदीत,अयोध्येचा राजा श्रीराम, मथुरा येथील श्रीकृष्ण, हरिद्वारमधील श्रीविष्णु, काशी येथील श्रीविश्वनाथ, कांची येथिल श्रीहरिहर, उज्जैन येथील श्रीमहाकाल, पुरी येथील श्रीजगन्नाथ, द्वारकेचा राणा श्रीद्वारकाधीश यांचे एकत्रित स्वरूप श्रीविठ्ठल, रूक्मिणी सहवर्तमान ब्राह्मण संतशिरोमणी,माऊली श्रीज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्या रूपाने सकल मानवाच्या इहलोक व परलोक कल्याणासाठी समाधिस्थ केशव आहे.
    $1,111.00 一般價格
    $999.90銷售價格

    March End Sale 2024

    Download PANDITJIPUNE

    下載「PANDITJIPUNE 」應用程式,隨時輕鬆掌握最新動態。

    掃描 QR 碼即可加入應用程式
    從 App Store 下載應用程式
    從 Google Play 下載應用程式
    • Instagram
    • Tumblr
    • Snapchat
    • Pinterest
    • Telegram
    • Gmail-logo
    • facebook
    • twitter
    • linkedin
    • youtube
    • generic-social-link
    • generic-social-link

    ©2025 

    bottom of page
    https://manage.wix.com/catalog-feed/v1/feed.tsv?marketplace=google&version=1&token=L6pyf%2F%2BCAsNOB5TcfltUWwm29a2SdYssSfYd%2BVC1LUyXMYQdHORi5DDXy48%2BwmbI&productsOnly=false