नवरात्र घटस्थापना Navratri Ghatsthapana
Navratri Puja Chandi paath Hawan
Service Description
घटस्थापना धर्मसिंधु आश्विन शुक्ल प्रतिपदेला देवीच्या नवरात्राचा आरंभ होतो. नवरात्र शब्दाने आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून आरंभ करून महानवमीपर्यंत करावयाचे कर्म जाणावें. या कर्मामध्ये पूजा प्रधान आहे. उपवासादिक व स्तोत्रं, जप इत्यादि अंगें होत. उपवास, एकभक्त, नक्त, अयाचित यांपैकी जसा कुलाचार असेल त्याप्रमाणे एखादे व्रत आणि सप्तशती, लक्ष्मीहृदयादि स्तोतें व जप जसा कुलाचार असेल त्याप्रमाणे कर्म यांनी युक्त प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ तिथींचे दिवशी पूजाख्य जे कर्म तो नवरात्र शब्दाचा अर्थ जाणावा.पूजेचे प्राधान्य सांगितले आहे याकरितां क्वचित कुलामध्ये जप, उपवास इत्यादिकांचा अभाव आढळतो. नवरात्रकर्मामध्ये पूजेचा अभाव मात्र कोणत्याही कुळामध्ये आढळत नाही. ज्या कुळामध्ये मुळी नवरात्रच करीत नाहींत त्यांमध्यें पूजेचा देखील अभाव असल्यास नवल नाहीं. त्यांची गोष्टच वेगळी. नवरात्र कर्माचे ठिकाणी ब्राह्मणादि चार वर्ण व म्लेच्छ इत्यादि यांना अधिकार आहे. ब्राह्मणानें जप, होम, अन्नाचा बली, नैवेद्य यांनी सात्विक पूजा करावी. क्षत्रिय व वैश्य यांना मांसादिकांनी युक्त व जप, होम यांनी सहित अशा राजसपूजेचाही अधिकार आहे. हा अधिकार केवल काम्य आहे, नित्य नाहीं. निष्काम अशा क्षत्रियाने सात्विक पूजा केली तर मोक्ष इत्यादि फलातिशय प्राप्त होतो. सप्तशती, जप, होम यांचे श्रवणानेच फळ मिळते असे सांगितले आहे. या नवरात्रामध्ये घट स्थापन करणे; प्रातःकाली, मध्याह्नकाल व प्रदोषकाली याप्रमाणे तीन वेळ, दोन वेळ अथवा एक वेळ आपापल्या कुलदेवतेचे पूजन करणे; सप्तशती इत्यादिकांचा जप; अखंड दीप; आपल्या आचारानुसार माळा बांधणे; उपवास, नक्त, एकभक्त इत्यादि नियमः सुवासिनीभो सुवासिनीभोजन; कुमारीभोजन, पूजन इत्यादि; शेवटच्या दिवशीं सप्तशती इत्यादि स्तोत्रमंत्राचा जप व होम याप्रमाणे कृत्ये करावी असे सांगितले आहे. यापैकी काही कुलांमध्ये घटस्थापना इत्यादि दोन तीन कर्मेच करतात, सर्व करीत नाहींत. कांहीं कुलांमध्यें घटस्थापनेवांचून इतर कांहीं करतात. कांहीं कुलांमध्ये सर्व करतात. या कर्मांचा समुच्चय ( सर्व कर्मे करणे ) अथवा विकल्प ( कांहीं कर्मे करणें ) यांची व्यवस्था आपापल्या कर्मांचा कुलाचाराप्रमाणे जाणावी. शक्ति असेल तथापि आपल्या कुलपरंपरेनें प्राप्त झालेल्या कर्माहून अधिक करू नयेत असा शिष्टाचार आहे. फलाची कामना धरून करावयाचा उपवास वगैरे कुलाचार नसला तथापि करावा.
Cancellation Policy
No refund on cancellation
Contact Details
+917875032009
vedmatagayatri4@gmail.com
Vrindavan Apartment No 506, Aanandghan Bulding, Garmal, Dhayari, Pune, Khadewadi, Maharashtra 411041, India