top of page
Search

श्री गणेश चतुर्थी पार्थिव गणेश पूजन बुधवार देि. ३१/०८/२२

Updated: Aug 26, 2022

संकष्ट नाशन चतुर्थी व्रत.

भाद्रपद शुद्ध पक्षातील चतुर्थीला महासिध्दीविनायकी चतुर्थी मानतात. ही चतुर्थी रविवारी अथवा मंगळवारी आल्यास तिचे माहात्म्य अधिक असते. हिला वरद चतुर्थी व शिवा असेही म्हणतात.

या दिवशी पार्थिव म्हणजे मातीचा गणपती करून त्याची ब्राह्मणांकडून प्राणप्रतिष्ठा करून पूजन करून विसर्जन करावे असे शास्त्र आहे. या गणपतीला वरद गणपती अशी संज्ञा आहे.


एरवी गणपतीस तुलसी पत्र वहावयाचे नसते हे फक्त या दिवशी गणपतीस तुलसीपत्र व वहावयाचे असते.


प्रत्येक प्राणिमात्राला संकटे चार प्रकारची आहेत. गर्भज, देहज, अंतिम व याम्यज या संकटातून मुक्त होण्याकरिता गणराया संकष्ट चतुर्थीचे व्रत सांगितले आहे. प्रसूतीजन्य,बाल्यावस्था,मरणात्मक तदनंतर यमलोकगमन या चार प्रकारच्या संकटांचा नाश करणारे व चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त करून देणारे म्हणून संकष्ट चतुर्थी व्रत प्रसिध्द आहे.


गणराज : "जे कोणी या दिवशी निराहार उपवास करतील व माझे भजन पुजन जपा दि अनुष्ठान नैमित्तिक साधन करतील त्यांना धर्म अर्थ काम व मोक्ष अशा चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती होईल."


या दिवशी मृण्मय मूर्तीचे ठिकाणी प्राणप्रतिष्ठा पूर्वक विनायकाची षोडशोपचारांनी पूजा करून एका मोदकाचा नैवेद्य द्यावा.

या चतुर्थीचे ठाई गणेशाच्या ध्यानाचे स्वरूप सांगतो.

स्कांदांत

"एकदन्तं शूर्पकर्णं नागयज्ञोपवीतिनं।।

पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धि विनायकम्।।"

अर्थ एकदंत शूर्पकर्ण सर्पाचे यज्ञोपवीत पाश व अंकुश धरणारा देव सिद्धिविनायक याचे ध्यान करावे.

गंधयुक्त 21 दुर्वा घेऊन

गणाधिपाय

उमापुत्राय

अघनाशनाय

विनायकाय

ईशपुत्राय

सर्वसिद्धीप्रदाय

एकदंताय

ईभवकत्राय

मूषकवाहनाय

कुमारगुरवे

या दहा नावाने प्रत्येक नावाला 22 याप्रमाणे दुर्वा समर्पण करून अवशिष्ट एक वरील दहाही नावांचा उच्चार करून समर्पण करावी. ब्राह्मणाला दहा मोदक देऊन आपण दहा भक्षण करावे. याप्रमाणे

विनायक व्रताचा संक्षेप जाणावा.

पूजा मुहूर्त: सूर्योदयापासून ते माध्यान्ह कालापर्यंत ग्राह्य आहे.

या चतुर्थीचे दिवशी चंद्र दर्शन झाले असता मिथ्या दोषाचा आरोप होतो. चंद्र दर्शन झाले तर दोष परिहारार्थ खालील श्लोकाचा जप करावा.

भविष्यपुराण:


"सिंहः प्रसेनमवधीत्सिंहो जम्बवता हतः ।।

सुकुमारक मा रोदीस्तव ह्येष्यः स्यमन्तकः"



शाडूच्या गणेश मुर्ती बुक करण्यासाठी कॉल करा.











Download the app Now

Click






72 views0 comments

Recent Posts

See All

अनुच्छिष्ट ध्यानाची कल्पना

अनुच्छिष्ट ध्यानाची कल्पना पुंडरीक : "परंतु आता जर तुझे 'हृदयपरिवर्तन' झाले असेल आणि तू माझ्या प्रेमासाठीच इथे आला असशील, तर मी जे जे...

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

Download PANDITJIPUNE

Download the “PANDITJIPUNE” app to easily stay updated on the go.

Scan QR code to join the app
Download on the App Store
Get it on Google Play
bottom of page
Locator
All locations
    https://manage.wix.com/catalog-feed/v1/feed.tsv?marketplace=google&version=1&token=L6pyf%2F%2BCAsNOB5TcfltUWwm29a2SdYssSfYd%2BVC1LUyXMYQdHORi5DDXy48%2BwmbI&productsOnly=false