वैशाख महिन्यांमध्ये प्रातःस्नान, तीळ आणि पितृतर्पण, धर्म घटाचे दान ही करावी. तसेच गंध, माळा, पन्हे, केळी इत्यादिकांनी ब्राम्हणांची वसंत पूजा करावी. वैशाख अथवा जेष्ठ यांपैकी ज्या मासामध्ये अतिशय नसेल त्या मासे प्रातःकाली नित्य पूजा करून गंध व उदक यांनी पूर्ण अशा पात्रांमध्ये विष्णुची स्थापना करावी व पंचोपचार पूजा करावी.त्याच जलामध्ये सूर्यास्तापर्यंत ठेवून रात्री स्वस्थानी स्थापना करून पंचोपचार पूजा करावी. त्यात विरोधकांनी स्वतः, भार्या व गृहातील इतर माणसे यांना पावन करावे. कृत्य द्वादशीला दिवसास करू नये. रात्री किंचित काल जलस्थ विष्णूची पूजा करून स्वस्थानी ठेवावा.या वैशाख मासामध्ये कृष्ण गौर नामक तुलसीने विष्णूची त्रिकाल पूजा करावी याचे फळ मुक्ती आहे.
प्रातःकाळी स्नान करून अश्वत्थ वृक्षाचे मुळी पुष्कळ उदक घालावे व प्रदक्षिणा कराव्या. याचे योगाने अनेक कुळे तरुण जातात. गाईचे अंग खाजवले असताही या प्रमाणे फळ मिळते. या महिन्यामध्ये एकभक्त, नंतर अथवा अयाचित ही सर्व इप्सित फळ देणारी आहेत. या महिन्यांमध्ये पानपुरी घालने देवावर उदकाची गळती बांधणे पंखा छत्री जोडा चंदन इत्यादिकांचे दान केल्याने मोठे फळ प्राप्त होते.
वैशाख शुक्ल तृतीया(अक्षय्य तृतीया): या दिवशी गंगा स्नान, यवहोम, यवदान यव भक्षण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. वैशाख सुकलं तृतीयेच्या दिवशी जो कृष्णाचे अंग चंदनाने भूषित करतो तो वैकुंठा प्रत जातो या तृतीयेला अक्षय्य तृतीया अशी संज्ञा आहे या दिवशी जे जे काही जप होम पितृतर्पण दान इत्यादी करावे ते सर्व अक्षय होते. या तृतीयेला बुधवार व रोहिणी नक्षत्र असा योग असेल तर महा पुण्यकारक होय. ही तृतीया कृतयुगाच्या आरंभ दिवस होय या दिवशी युगादी श्राद्ध करावे.
वैशाख शुक्ल तृतीया(अक्षय्य तृतीया): या दिवशी गंगा स्नान, यवहोम, यवदान यव भक्षण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. वैशाख शुक्ल तृतीयेच्या दिवशी जो कृष्णाचे अंग चंदनाने भूषित करतो तो वैकुंठाप्रत जातो. या तृतीयेला अक्षय्य तृतीया अशी संज्ञा आहे. या दिवशी जे जे काही जप, होम, पितृतर्पण, दान इत्यादी करावे.ते ते सर्व अक्षय होते. या तृतीयेला बुधवार व रोहिणी नक्षत्र असा योग असेल तर महा पुण्यकारक होय. ही तृतीया कृतयुगाच्या आरंभ दिवस होय. या दिवशी युगादी श्राद्ध करावे.श्राद्ध करणे शक्य नसेल तर तिलतर्पण तरी करावे.या तृतीयेला देवता व पितर यांचे उद्देशाने उदकुंभ दान करावे. श्री परमेश्वर प्रिती द्वारा उदकुंभ दान कल्पोक्त् फल आवाप्त्यार्थ ब्राह्मणाय उदकुंभ दानं करिष्ये। याप्रमाणे संकल्प करून सूत्राने वेष्ठीलेल्या गंध, फल युक्त अशा कलशाची व त्याचप्रमाणे ब्राम्हणाची पंचोपचारांनी पूजा करून एष धर्मघटो दत्तो ब्रह्म विष्णु शिवात्मकः। अस्य प्रदानात्तृप्यन्तु पितरोपि पितामहाः।। गन्धोदक तिलै मिश्रम् स्नानं कुम्भ फलान्वितं। पितृभ्य: संप्रदस्यमि अक्षय्यमुपतिष्ठतु।। या मंत्राने ब्राह्मणाला कलशाचे दान करावे. युगादी तिथी चे दिवशी समुद्र स्नानाचे महाफल सांगितले आहे. युगादी श्राद्धाचा लोप झाल्यास युगादि श्राद्ध लोप जन्य प्रत्यवायपारिहरार्थं ऋग्विधनोक्त प्रायश्चित्तं करिष्ये। असा संकल्प करून "नयस्यद्यवा"या ऋचेचा शंभर वेळा जप करावा.
Comments