अगोदर क्षौर करून 12 मृत्तिका स्नाने आणि प्राणायाम वगैरे करून व्यास पूजा करावी
देशकालादिकांचा उच्चार करून
चातुर्मास्यवाससंकल्पं कर्तुं श्रीकृष्णव्यासभाष्यकारणाम् सपरिवाराणाम् पूजनं करिष्ये।
याप्रमाणे संकल्प करावा. मध्यभागी श्रीकृष्ण व त्यांच्या पूर्वेकडून
प्रदक्षिणवृत्ताने वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांचे आवाहन करावे. श्रीकृष्णादि पाच दैवतांच्या दक्षिणभागी व्यास व त्यांच्या पूर्व दिशेकडून प्रदक्षिण क्रमाने सुमंतु, जैमिनी, वैशंपायन व पैल असे व्यासपंचकाचे आवाहन करावे.श्रीकृष्णादि देवतांच्या डाव्या बाजूला भाष्यकार श्रीमचछशंकराचार्य आणि आणि त्यांच्या पूर्व दिशेकडून पद्मपाद,विश्वरूप, त्रोटक व हस्तामलक या आचार्यांचे आवाहन करावे. श्रीकृष्णदि पाच देवतांमध्ये - श्रीकृष्णाच्या दोन बाजूंस ब्रह्मा आणि रुद्र पूर्व इत्यादी चार दिशांना सनक, सनंदन, सनातन आणि सनत्कुमार, आणि पुढे परमगुरु परमेष्ठी गुरु ब्रम्हा
वसिष्ठ, शक्ति, पराशर, व्यास, शुक्र, गौडपाद,गोविंदपाद, शंकराचार्य व इतर ब्रह्मनिष्ठ यांचे आवाहन करावे. या पंचतत्र याचे आग्नेयेस गणेश, ईशान्येस क्षेत्रपाल, वायव्येस दुर्गा, नैऋत्येस सरस्वती आणि पूर्व इत्यादी आठ दिशांचे ठिकाणी आणि लोकपाल यांचे आवाहन करावे आणि सर्वांची पूजा करावी. त्यामध्ये नारायणाच्या अष्टाक्षर मंत्राने श्रीकृष्णाची पूजा करावी व इतरांची प्रणव पूर्वक नमोंत अशी त्यांच्या त्यांच्या नाम मंत्रांनी करावी.
Comments