या वर्षी पार्थिव गणेश पूजन 18 तारखेला करावे की 19 तारखेला? शास्त्रार्थ
धर्मसिंधु- अथचतुर्थीनिर्णयः चतुर्थीगणेश नारिकोपवासकार्यपञ्चमीयुताग्रा गौरीविनायकबत्योस्तुमध्यापापिनाया पर दिनएवमध्यान्यापि स्पेनमैकदेशव्याप्तीचपूर्वव तृतीयायोगप्राशस्त्यात् नागवतेनुपूर्वदिनय मध्यान्हव्यापिनी चेत्पूर्वच उभयदिनमध्यान्हव्याप्त्यादिपक्षचतुष्टयेपचीयु तैवाद्या संकष्ट चतुर्थीतु चन्द्रोदयव्यापिनीग्राद्या परदिने चन्द्रोदयव्यासोपव उभयदिने चन्द्रोदयव्यापित्वेतृतीयायुतैवाद्या दिनद्वयेचन्द्रोदयव्याप्त्यभावे परैव इतिचतुर्थीनिर्णयोदशमउद्देशः
चतुर्थी तिथीचा निर्णय.
गणेश व्रत खेरीज करून अन्य उपवासादिक असता पंचमीयुक्त घ्यावी. गौरीविनायक व्रताला मध्यान्हव्यापिनी घ्यावी. दुसम्या दिवशीच मध्यान्हकालव्यापिनी असेल तर दुसऱ्या दिवसाचीच घ्यावी. दोन दिवस मध्यान्हन्याप्ति असेल, दोन्ही दिवशी मध्यान्हव्याप्त नसेल, दोन्ही दिवशी सारखी अथवा कमी अधिक एकदेशव्याप्ति असेल, तर तृतीयायोग प्रशस्त आहे म्हणून पहिल्या दिवसाचीच घ्यावी. नागव्रताला पहिल्या दिवशी मध्यान्हकालव्यापिनी असेल तर पहिली घ्यावी. दोन्ही दिवशी मध्यान्हकालव्यापिनी असेल, किंवा नसेल किंवा कमी अधिक असेल तरी पंचमीयुक्त असेल तीच घ्यावी. संकष्ट चतुर्थी चंद्रोदयव्यापिनी असेल ती घ्यावी. दुसऱ्या दिवशीं चंद्रोदयव्याप्ति असेल तर दुसरी घ्यावी. दोन्ही दिवशी चंद्रोदयव्याप्ति असेल तर तृतीयायुक्त असेल तीच घ्यावी. दोन्ही दिवशी चंद्रोदयव्याप्ति नसेल तर दुसरी घ्यावी. इति दशमः ॥ १० ॥
कर्माचे दोन प्रकार आहेत- दैवक व पित्र्यकमें. देवकमीचे सहा प्रकार एकभुक्त, नक्त, अयाचित, उपवास, व्रत आणि दान. मध्यान्हकाळी एकदां एकाच अन्नाचे भक्षण ते एकभक्त, रात्री प्रदोषकाळी भोजन ते नक्क, याचना केल्यावांचून ज्या दिवशी जे अन्न मिळेल त्याचे भोजन ते अयाचित, स्त्रीपुत्रादिकांजवळ याचना केल्यावांचून इतर दिवशी मिळालेल्या अन्नाचे भोजन देखील अयाचितच होय अर्सेही कोणी क्षणतात, अहोरात्र भोजन न करणे याचे नांव उपवास, पूजनादि स्वरूप विशिष्ट कर्म ह्मणजे व्रत, आपल्या मालमत्तेवरील आपली सत्ता काढून दुसन्याची सत्ता स्थापणे याचे नांव दान. एकभक्तादि कर्म कचित् प्रतादिकांचे अंग म्हणून
सांगितली आहेत, क्वचित एकादशी आदिकरून उपवासांच्या प्रतिनिधिरूपाने सांगितली आहेत, कचित् स्वतंत्र सांगितली आहेत. याप्रमाणे त्यांचे तीन प्रकार आहेत. अंगरूप अथवा प्रतिनिधिरूप कर्माचा निर्णय प्रधानकर्माच्या निर्णयाप्रमाणे जाणावा.
स्वतंत्र कर्माचा निर्णय - दिवसाचे पांच भाग करावे; पहिला भाग प्रातःकाल, दूसरा संग काल, तिसरा मध्याह्नकाल, चवथा अपराहकाल आणि पांचवा सामान्हकाल. सूर्यास्तानंतर तीन मुहूर्तपर्यंत प्रदोषकाल असतो. एकभुक्त कर्माला मध्यान्ह व्यापिनी तिथी माझ समजावी. त्यामध्ये देखील दिवसाचा अर्धमाग गेल्यावर, तीस घटिकांचे मध्यम दिनमान धरून सोळाव्या घटिकेच्या आरंभापासून अठराव्या घटिकेच्या अखेरीपर्यंत तीन घटिका मुख्य भोजनकाल होय. त्यापुढे सायंकालपर्यंत गौणकाल समजावा. तिथीच्या व्याप्तिविषयी सहा पक्ष आहेत ते हे-
१ पूर्व दिवशीं मुख्यकालीं व्याप्तिदिवशी,
२ दुसन्या दिवशी व्याप्ति,
३ दोन्ही दिवशी व्याप्ति,
४ दोन्ही दिवशीं व्याप्तीचा अभाव,
५ दोन्ही दिवशी अंशतः सारखी व्याप्ति आणि
६ दोन्ही दिवशीं कमी अधिक अंशाने व्याप्ति.
जर पूर्व दिवशीं मुख्यकाली आवाहन तिथि असेल तर पूर्व दिवस घ्यावा, दुसऱ्या दिवशीं असेल तर दुसरा दिवस घ्यावा हे उघड आहे. दोन्ही दिवशी पूर्ण व्याप्ति असेल तर युग्म वाक्यावरून निर्णय करावा. दोन्ही दिवशी व्याप्तीचा अभाव असेल तर गौणकाली व्याप्ति आहे यास्तव पूर्व घ्यावी. दोन्ही दिवशी अंशतः सारखी व्याप्ति असेल तर पूर्व तिथी घ्यावी. कमी अधिक प्रमाणानेच असल्यास (अ) दोन्ही दिवशी कर्मसमाप्तीपुरती तिथी असल्यास युग्मवाक्यावरून निर्णय करावा; ( ब ) कर्म समाप्तीपुरती तिथी नसल्यास पूर्वीचीच घ्यावी. याप्रमाणे एकभक्ताचा निर्णय झाला
शुक्लचतुर्थ्यां सिद्धिविनायक व्रतम् सामध्याहव्यापिनी ग्राह्या दिनदये साफ- स्पेनमध्या हे व्याप्तावव्याप्तीवापूर्वी दिनद्वये साम्येनवैषम्येणवैकदेश व्याप्तावपि पूर्वेव वैषम्येणव्याप्ताधिकव्यापिनी चेत्परेति केचित् पूर्वदिने सर्व धामध्याह्नस्पर्शो नास्त्येव परदिने एवमध्याह्नस्पर्शिनीतदेवपरा पूर्वदिने एकदेशेन मध्याहव्या पिनीपरदिने संपूर्णमध्याह्नय्यापिनीतदा पिपरैव एवंमासान्तरेपिनिर्णयः इथं रवि भौमवारयोगेप्रशस्ता ।
भाद्रपद शुक्र चतुर्थीचे दिवशी सिद्धिविनायक व्रत करावे. चतुर्थी मध्याह्नय्यापिनी असेल ती घ्यावी. दोन दिवस साकल्याने मध्याह्नन्याप्ति असेल अथवा दोन्ही दिवशीं नसेल तर पूर्व दिवसाची घ्यावी. दोन दिवस समान अथवा विषम एकदेशव्याप्ति असेल तेव्हांही पूर्व दिवसाचीच घ्यावी. विषम कमी जास्त व्याप्ति असेल तेव्हां दुसन्या दिवशीं अधिक व्याप्ति असल्यास ती घ्यावी असे कोणी ग्रंथकार सणतात. पूर्व दिवशी मध्याह्नस्पर्श मुळींच नसेल आणि दुसऱ्या दिवशीच मध्याह्नस्पर्श असेल तेव्हां दुसऱ्या दिवसाचीच ध्यावी. पूर्व दिवशी एकदेशानें मध्याह्नव्याप्ति आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण मध्याह्नव्याप्ति असेल तेव्हांही दुसऱ्या दिवसाचीच घ्यावी. याप्रमाणे इतर महिन्यांचे ठिकाणीही निर्णय जाणावा. ही चतुर्थी रविवार व मंगळवार हे योग असतां प्रशस्त आहे.
चन्द्रधिष्याभिवन दोषस्तेन चतुर्थादिदर्श विनायक दिने पिनदोपायपूर्व दिने सायाह्नमारभ्यमवृत्तायां चतुथ्यविनायक- व्रताभावेपिपूर्वेद्युरेव चन्द्रदर्शने दोषइतिसिध्यति चतुर्थ्यामुदितस्यनदर्शन मिति पक्षेतु अवशिष्टपञ्चषण्मुहूर्तमात्रचतुर्थीदिनेपिनिषेधापत्तिः इदानीलोकास्तु एक- तरपक्षाश्रयेण विनायक व्रत दिने एव चन्द्रन पश्यन्तिनतूदयकालेदर्शनकाले वा चतुर्थीसत्वासत्वे नियमेनाश्रयन्ति दर्शने जाते तदोपशान्तये सिंहः प्रसेनमवधी- सिंहोजाम्बवता हतः । सुकुमारकमारोदीस्त वयेषस्यमन्तकः १ इतिश्लोकजपः
कार्यः तत्रमृन्मयादिमृतप्राणप्रतिष्ठा पूर्वकं विनायकंषोडशोपचारैः संपूज्यैकमो- केन नैवेद्यदन्यास गन्धकविंशतिगृहीत्वा गणाधिपायोमापुत्रायाघना- शनायविनायकायेश पुत्राय सर्वसिद्धिप्रदायैकदन्ताये भववत्रायमूषकवाहना- यकुमारगुरवेइतिदशनामभिर्वयोर्यद्वयं समवशिष्टा मेकां उक्तदर्शना मभिः समर्पयेत् दशमोदकान् विप्रायदत्त्वा दशस्वयं भुञ्जीतेतिसंक्षेपः ।
या चतुर्थीचे दिवशी चंद्रदर्शन झालें असतां मिथ्या दोषाचा आरोप होतो. चतुर्थीला उदय पावलेल्या चंद्राचे दर्शन पंचमीमध्ये होईल व तो विनायकव्रताचा दिवस असेल तर दोष नाही. पूर्व दिवशी सायाह्नकाली आरंभ झालेल्या चतुर्थीचे दिवशीं विनायकव्रताचा अभाव असेल तरी त्या पूर्व दिवशीच चंद्रदर्शनाचा दोष आहे असे सिद्ध होतें. चतुर्थीमध्ये उदय पावलेल्या चंद्राचें दर्शन घेऊं नये' असा घेतला असतां अवशिष्ट दहा बारा घटिका चतुर्थीचे दिवशीही चंद्रदर्शनाच्या निषेधाचा प्रसंग येईल. सांप्रत लोक कोणत्या तरी एका पक्षाचा आश्रय करून विनायक व्रताचे दिवशी मात्र चंद्र पहात नाहीत. उदयकाली अथवा दर्शनकाली चतुर्थी आहे किंवा नाहीं यासंबंधाचा नियम स्वीकारीत नाहींत. निषिद्धकाली चंद्रदर्शन होईल तर दोषाची शांति होण्याकरितां "सिंहः प्रसेनमवधीसिंहो जाम्बवता हतः सुकुमारकमारोदीस्तव ह्येषः स्यमन्तकः॥" ह्या श्लोकाचा जप करावा.या दिवशीं मृन्मय इत्यादि मूर्तीचे ठिकाणी प्राणप्रतिष्ठापूर्वक विनायकाची षोडशोपचारांनी पूजा करून एका मोदकाचा नैवेद्य द्यावा. गंधयुक्त एकवीस दूर्वा घेऊन" गणाधिपाय, उमापुत्राय, अघनाशनाय, विनायकाय, ईशपुत्राय सर्वसिद्धिप्रदाय, एकदन्ताय, ईभवक्त्राय, मूषकवाहनाय, कुमारगुरवे " या दहा नांवांनी प्रत्येक नांवाला दोन दोन याप्रमाणे दूर्वा समर्पण करून अवशिष्ट एक वरील दहाही नांवांचा उच्चार करून समर्पण करावी. ब्राह्मणाला दहा मोदक देऊन आपण दहा भक्षण करावे. याप्रमाणे विनायकव्रताचा संक्षेप जाणावा.
निर्णयसिंधु
चतुर्थ्य पिसर्वमतेगणेशव्रतातिरिक्तापरैव युग्मवाक्यात्....
चतुर्थीनिर्णय: सर्व ग्रंथांच्या मती चतुर्थी, गणेशव्रत वर्ज्य करून अन्य सर्व व्रतांविषयीं पराच (पंचमीयुक्त) घ्यावी कारण, चतुर्थी व पंचमी यांचे युग्म आहे.
गणेश तृतीयायुतैव चतुर्थी चतुर्थीतृतीयायां महापुण्यफलप्रदा कर्तव्याप्रतिमिवेत्सगणनाथसुतोष- नीति हेमाद्रीब्रह्मवैवर्तात् माधवीयेदुगणेशन मध्याहृव्यापिनीमुख्या चतुर्थीगणनाथस्य मातृदि साप्रशस्यते मध्याहृव्यापिनीचेत्स्यात्परतश्रेत्परेहनीति बृहस्पतिवचनात् प्रातः शुरू दिले नालामच्या पूजयेनृपेतितत्कल्पेभिधानाच्च तेनपरदिनेतच्येपरा अन्यथापूर्वेत्युक्तं वस्तुतस्तु यत्रभाद्रशुक्रुचतुर्थ्या- दागणेशप्रतविशेषे मध्याहपूजोक्तावद्विषयाण्येवप्रागुक्तवचनानि नघुसार्वत्रिकणि संकष्ट चतुभ्यांदीहून कर्मकाळानांबाधापत्तेः तेनसर्वत्रगणेशप्रते पूर्ववेतिसिद्धं संकष्ट चतुर्थीतु चंद्रोदयव्यापिनीमाया दिद्वयेतस्ये मातृयोगस्यसत्त्वात्पूर्वेति केचित् अन्येतुदिनेमुहूर्तत्र्यादिरूपस्यतृतीयायोगस्याभावात परदिनेमाचवोक्त- मध्याह्रव्यापिसत्त्वात्संपूर्णत्वाचपरेत्याचक्षते दिनद्वयेतदभावेतुपरैव गौरीप्रतेतुपूर्वव गणेशगारी बहुलाव्यति- रिक्ताःप्रकीर्तिताः चतुर्थ्यःपंचमीविद्धादेवतांतरयोगतइति मदनरत्नेत्रह्मवैवर्तात् ।
गणेशव्रताविषयीं चतुर्थी, तृतीयायुक्तच घ्यावी; कारण, "तृतीयायुक्त चतुर्थी महापुष्पफलप्रदा असून गणनाथाचा सुसंतोष करणारी आहे. यास्तव मती यांनी तीच (तृतीयायुक्त) करावी" असे हेमाद्रीत ब्रह्मवैवर्तवचन आहे. माधवी- यांत तर गणेशत्रताविषयीं चतुर्थी मध्यान्हकालव्यापिनी मुख्य होय. कारण, गणनाथचतुर्थी पूर्वदिवशीं मध्याकालव्यापिनी असेल तर तृतीयायुक्त ती प्रशस्त होय, दुसन्या दिवशी मध्यान्हकालव्यापिनी असेल तर दुसन्या दिवसाची करावी" असे बृहस्पतिवचन आहे; आणि "प्रातः काली तिल अंगास लावून स्नान करून मध्याह्नकाली पूजा करावी" असे गणपति- कल्पांतही वचन आहे, तेर्णेकरून दुसऱ्या दिवशीं मध्याहकालव्याप्ति असेल तर परा करावी; दुसन्या दिवशी मध्याहकान्यात नसत पूर्वा करावी, असे सांगितले आहे. वास्तविक म्हटले तर ज्या भाद्रपद शुक्ल चतुर्थी इत्यादि विशेष व्रताचेठायीं मध्या- काली पूजा विहित आहे तद्विषयकच पूर्वोक्त वचनें आहेत. सर्वचतुर्थीनत विषयक नाहीत; कारण, सर्वत्र पंचमीत घेटली तर संकष्ट चतुर्थी इत्यादि प्रतांच्या बहुत कर्मकालाचा बाद होईल, यास्तव सर्वत्र ठिकाण गणेशमताविषय चतुर्थी पूर्वाच घ्यावी, असे सिद्ध झालें, संकष्टचतुर्थी तर चंद्रोदयव्यापिनी घ्यावी. दोन दिवशी चंद्रोदयव्यापिनी असेल तर, तृतीयायुती प्रशस्त असल्यामुळे पूर्वी घ्यावी, असें केचित् म्हणतात. इतर ग्रंथकार तर, दिवसा मुहूर्तत्रयादिरूप जो तृतीयायोग तो नसल्याकारणानें परदिवशी माधवाने सांगितलेली मध्याह्वव्याप्ति असल्यामुळे व तिथि संपूर्ण असल्यामुळे दुसन्या दिवसाची प्यावी, असे म्हणतात, दोन दिवशीं चंद्रोदयव्यापिनी नसेल तर दुसऱ्या दिवसाचीच घ्यावी. गौरीव्रताविषयीं तर पूर्वदिवसा- चीच घ्यावी; कारण, “गणेशव्रत, गौरीव्रत ( श्रावण कृष्णचतुर्थी बहुला अशी प्रसिद्ध सी) यांवाचून अन्य व्रताविषयी चतुर्थी पंचमीविद्धा घ्याव्या; कारण, अन्यदेवतायोग आहे" असे मदनरज्ञांत ब्रह्मवैवर्तवचन आहे.विषयीं चतुर्थी, तृतीयायुक्तच घ्यावी; कारण, "तृतीयायुक्त चतुर्थी महापुष्पफलप्रदा असून गणनाथाचा सुसंतोष करणारी आहे. यास्तव मती यांनी तीच (तृतीयायुक्त) करावी" असे हेमाद्रीत ब्रह्मवैवर्तवचन आहे. माधवी- यांत तर गणेशव्रताविषयीं चतुर्थी मध्यान्हव्यपिनी मुख्य होय. कारण, गणनाथचतुर्थी पूर्वदिवशीं मध्यान्हव्यपिनी असेल तर तृतीयायुक्त ती प्रशस्त होय, दुसन्या दिवशी मध्याहकालव्यापिनी असेल तर दुसन्या दिवसाची करावी" असे बृहस्पतिवचन आहे; आणि "प्रातः काल शुरू तिल अंगास लावून ज्ञान करून मध्याह्नकाली पूजा करावी" असे गणपति- कल्पांतही वचन आहे, तेर्णेकरून दुसऱ्या दिवशीं मध्याहकालव्याप्ति असेल तर परा करावी; दुसन्या दिवशी मध्याहकान्यात नसत पूर्वा करावी, असे सांगितले आहे. वास्तविक म्हटले तर ज्या भाद्रपद शुक्ल चतुर्थी इत्यादि विशेष व्रताचेठायीं मध्या- काली पूजा विहित आहे तद्विषयकच पूर्वोक्त वचनें आहेत. सर्वचतुर्थी विषयक नाहीत; कारण, सर्वत्र पंचमीत घेतली तर संकष्ट चतुर्थी इत्यादि प्रतांच्या बहुत कर्मकालाचा बाध होईल, यास्तव सर्वत्र ठिकाण गणेशमताविषय चतुर्थी पूर्वाच घ्यावी, असे सिद्ध झालें, संकष्टचतुर्थी तर चंद्रोदयव्यापिनी घ्यावी. दोन दिवशी चंद्रोदयव्यापिनी असेल तर, तृतीयायुती प्रशस्त असल्यामुळे पूर्वी घ्यावी, असें केचित् म्हणतात. इतर ग्रंथकार तर, दिवसा मुहूर्तत्रयादिरूप जो तृतीयायोग तो नसल्याकारणानें परदिवशी माधवाने सांगितलेली मध्याह्वव्याप्ति असल्यामुळे व तिथि संपूर्ण असल्यामुळे दुसऱ्या दिवसाची घ्यावी, असे म्हणतात, दोन दिवशीं चंद्रोदयव्यापिनी नसेल तर दुसऱ्या दिवसाचीच घ्यावी. गौरीव्रताविषयीं पूर्वदिवसा- चीच घ्यावी; कारण, “गणेशव्रत, गौरीव्रत ( श्रावण कृष्णचतुर्थी बहुला अशी प्रसिद्ध सी) यांवाचून अन्य व्रताविषयी चतुर्थी पंचमीविद्धा घ्याव्या; कारण, अन्यदेवतायोग आहे" असे मदनरत्न ब्रह्मवैवर्तवचन आहे.
भाद्रशुक्लचतुर्थीवरदचतुर्थी सामध्याहष्यापिनीमाया प्रातः शुष्कृतिलै: नात्यामध्याद्वेपूजयेन्नृपेति हेमा- द्रौभविष्येतत्रैवपूजो केः मदनरत्नेप्येवं परदिनेएवशिन साकल्येनवामध्या हव्यात्यभावे सर्वपक्षेषुपूर्वा- माह्या तथाच वृहस्पतिः चतुर्थीगणनाथस्वमातृ विद्वाप्रशस्यते मध्यालव्यापिनी चेत्स्यात्परतश्चेत्परेनीति मातृबिद्धाप्रशस्तास्याश्चतुर्थीगणनायके मध्यापरतश्चेत्स्यान्नागविद्धा प्रशस्यतइतिमाधवीयेस्मृतराव तंत्रगणेशरूपस्कांदे एकदंतंशूपकर्णनागयज्ञोपवीतिनं पाशांकुशधरं देवं ध्यायेत्सिद्धिविनायकमिति इयंरवि- भौमयोरतिप्रशस्ता भाद्रशुङचतुर्थीयाभौमेनार्केणवायुता महतीसात्रविशेशमर्चित्वेष्टंल मे नरइति निर्णयामृ- तेवाराहोक्तेः । अत्रचंद्रदर्शनंनिषिद्धं तथाचापराकैमार्कडेयः सिंहादित्येङ्गुकुषक्षेचतुर्थ्याचंद्रदर्शनं मिथ्याभिदूषणंकुर्यात्तस्णात्पश्येनतंसदेति चतुर्थ्यानपश्येदित्यन्वयः प्रधानक्रियान्वयलाभात् तेनचतुर्थ्यां मुदितस्यपंचम्यांननिषेधः गौडा अध्येवमाहुः पराशरोपि कन्यादित्येचतुभ्यांतुशुक्ठे चंद्र प्रदर्शनं मिथ्या- भिदूषणं कुर्यान्तरमात्पश्येनतंसदा तदोपशान्तये सिंहः प्रसेननितिवैपठेदिति लोकस्तु विष्णुपुराणे सिंहःम- सेनमवधीत्सिंहोजांबदताहतः सुकुमारकमारोदीस्तव ह्येषस्यमंतकइति ।
भाद्रपद शुक्ल चतुर्थी ती वरद चतुर्थी मध्यान्हव्यपिनी घ्यावी. कारण, "प्रातः काली पांढरे तिल अंगास लावून स्नान
करून माध्यान्ह पूजन करावें." अशी हेमाद्रींत भविष्यांत मध्याहीच पूजा उक्त आहे.मदनरत्नातही असे
आहे.
तिथीचे सहा पक्ष आहेत ते असे
१ पूर्व दिवशीच मध्याहव्यापिनी
२पर दिवशीच मध्याहव्यापिनी
३ दोन्हीदिवशी मध्याहन्यापिनी नाहीं,
४ दोन्ही दिवशीं सकल मध्याहव्यापिनी
५ दोन्ही दिवशी मध्याती अंशाने समव्यापिनी
६ दोन्ही दिवशी अंशाने विषमव्यापिनी.
या सहा पक्षांत पर दिवशीच मध्याहन्यात आहे, मग ती सकल मध्याहन्यात असो किंवा अंशतः मध्याहव्याप्ति असो, आणि पूर्व दिवशी मुळीच मध्याहन्यात नाहीं तर ह्या वरील दुसन्या पक्ष पराच करावी. इतर सर्व पक्ष पूर्वी करावी. तेंच सांगतो बृहस्पति गणेशचतुर्थी मध्याव्यापिनी असेल तर मातृविद्धा (तृतीयायुक्त) प्रशस्त होय. पर दिवशीच मध्याहव्यापिनी असेल तर पर दिवशीच करावी." आणि "गणपतीचे पूजना- विषय चतुर्थी तृतीयायुक्त असून मध्याहीं असेल तर ती प्रशस्त होय; पर दिवशीच तशी (मध्याहव्यापिनी ) असेल तर पंचमी- विद्धा प्रशस्त आहे" असे माधवीयांत स्मृत्यंतरही आहे. या चतुर्थीचे ठायीं गणेशाच्या ध्यानाचे स्वरूप सांगतो- स्कांदांत - "एकदंतं शूर्पकर्ण नागयशोपवीतिनं ॥ पाशांकुशधरं देवं ध्यायेत्सिद्धिविनायकं."
अर्थ : एकदंत, शूर्पकर्ण, सर्पाचे यशोपवीत, पाश व अंकुश धरणारा, देव सिद्धिविनायक त्याचे ध्यान करा. त्या चतुर्थीस रवि किंवा भौम वार असतां अति प्रशस्त आहे. कारण, “भाद्रपद अर्थी जी भौम किंवा रविवार यांनी युक्त ती महती होय. तिचे ठायीं गणपतीचे पूजन केले असतां मनुष्यांस इष्टप्राप्ति होते" असे निर्णयामृतांत वाराहवचन आहे. चतुर्थीचे ठायीं चंद्रदर्शन निषिद्ध तेंच सांगतो अपराकत मार्कडेय- "सिंहराशीस सूर्य असता शुक्ल पक्षात चंद्र दर्शन झाले तर मिथ्यापवाददोष येतो. म्हणून या चंद्रास चतुर्थीत पाहूं नये" चतुर्थीत पाहू नये असा अन्वय करावा. असा केला असतां प्रधानक्रियेचा अन्वय होतो. तेर्णेकरून चतुर्थीत उदय झालेल्या चंद्राचे दर्शन पंचमीत झाले असतां तो दिवस बिनायकवताचा असला तरी निषेध नाहीं. गौडही असेच सांगतात. पराशरही "कन्याराशीस सूर्य जातो त्या मासांत शुक्लपक्ष चतुर्थीस चंद्राचे दर्शन झालें असतां मिथ्याभिदूषण प्राप्त होते, म्हणून या चतुर्थीस कधीच चंद्रास पाहूं नये. आणि पाहिला असतां त्या दोषाचे शांतीकरिता 'सिंहः प्रसेन०' या श्लोकाचा जप करावा."
तो श्लोक असा-
विष्णुपुराणांत "सिंहः प्रसेनमवधीसिंहो जांबवता हतः । सुकुमारक मा रोदीस्तव ह्येष स्वमंतक:"
निर्णय:
या वर्षी श्री गणेश स्थापना व पूजा सोमवार दिनांक 18.09.2023 लाच करावी.
कारण
1) या दिवशी चतुर्थी तिथि ही माध्यान्ह काली 12.40 पासून प्रारंभ होते व 19 तारखेला दुपारी 1.48 पर्यंत आहे. याचाच अर्थ असा की माध्यान्ह काळात चतुर्थी चा स्पर्श होऊन 18 तारखेचा उर्वरीत माध्यान्ह काल व्यापून टाकत आहे म्हणून ती माध्यान्ह काळी आहे.
2) उदयते तिथि म्हणजे जी तिथि सूर्योदयाच्या वेळी असते ती तिथि त्या दिवसाची किंबहुना दिवसभर मानली जाते हा नियम गणेश चतुर्थीला विशेषता: भाद्रपद शुक्ल चतुर्थीला लागू होत नाही कारण ती तिथि चंद्रोदयव्यापीनी घ्यावी असे शास्त्र आहे.
3) 18 तारखेला चंद्रोदय होतो आहे आणि 19 तारखेला चंद्र रात्री 9.21 ला मावळतो आहे. म्हणून चंद्र दर्शन 18 तारखेलाच निषिद्ध आहे कारण आकाशात रात्रभर चंद्र दर्शन होणार आहे. 18 तारखेची चतुर्थी चंद्रोदय व्यापीनी आहे.
4) श्राद्ध माध्यान्ह काळी करतात एका पंचांगात चतुर्थी श्राद्ध 18 ला दिले आहे तर 19 ला माध्यान्ह काल कसा बरे ग्राह्य धरायचा?
5) गणेश पूजन करिता रविवार व मंगळवार अधिक श्रेयस्कर असतो म्हणून शास्त्र सम्मत नसतानाही मंगळवारी बळेच गणेश पूजन करणे कितपत योग्य आहे?
6) धर्म सिंधु नुसार चतुर्थी तिथीचा निर्णय.
गणेश व्रत खेरीज करून अन्य उपवासादिक असता पंचमीयुक्त घ्यावी. 19 तारखेला पंचमी युक्त चतुर्थी आहे तर 18 तारखेला तृतीया युक्त चतुर्थी आहे.
7) संकष्ट चतुर्थी चंद्रोदयव्यापिनी असेल ती घ्यावी. दुसऱ्या दिवशीं चंद्रोदयव्याप्ति असेल तर दुसरी घ्यावी.दोन्ही दिवशी चंद्रोदयव्याप्ति असेल तर तृतीयायुक्त असेल तीच घ्यावी. दोन्ही दिवशी चंद्रोदयव्याप्ति नसेल तर दुसरी घ्यावी. 18 व 19 तारखेला दोन्ही दिवशी चंद्रोदयव्याप्ति आहे म्हणून तृतीयायुक्त असेल तीच घ्यावी.
8) जर पूर्व दिवशीं मुख्यकाली आवाह्यतिथी असेल तर पूर्व दिवस घ्यावा, 18 तारखेला मुख्यकाली आवाह्यतिथी आहे.
9) दोन्ही दिवशी पूर्ण व्याप्ति असेल तर युग्म वाक्यावरून निर्णय करावा. दोन्ही दिवशी व्याप्तीचा अभाव असेल तर गौणकाली व्याप्ति आहे यास्तव पूर्व घ्यावी. दोन्ही दिवशी अंशतः सारखी व्याप्ति असेल तर पूर्व तिथी घ्यावी.19 तारखेला गौणकाली व्याप्ति आहे यास्तव पूर्व 18 तारखेची घ्यावी.
10)ही चतुर्थी रविवार व मंगळवार हे योग असतां प्रशस्त आहे. पण ती केव्हा? जेव्हा ती चंद्रोदयव्यापिनी असेल तेव्हाच अन्यथा नाही.
11) या चतुर्थीचे दिवशी चंद्रदर्शन झालें असतां मिथ्या दोषाचा आरोप होतो. चतुर्थीला उदय पावलेल्या चंद्राचे दर्शन पंचमीमध्ये होईल व तो विनायकव्रताचा दिवस असेल तर दोष नाही. उदय झाल्यावरच चंद्र दर्शन होते चंद्रोदय 18 तारखेला आहे म्हणून चंद्र दर्शन 18 तारखेला रात्री आहे. म्हणून चंद्र दर्शन निषेध 18 तारखेला रात्री आहे 19 तारखेला मुळीच नाही.
12) विनायक व्रताचे दिवशी मात्र चंद्र पहात नाहीत. उदयकाली अथवा दर्शनकाली चतुर्थी आहे किंवा नाहीं यासंबंधाचा नियम निदान या वर्षी तरी स्विकारलाच पाहिजे.
कैलेंडर, पंचांग,गूगल कांहीही म्हणू दे या वर्षी पार्थिव गणेश पूजा ही 18 सप्टेंबरला होणे गरजेचे आहे. देर आये दुरूस्त चुस्त दुरुस्त तंदुरुस्त आए. Late better than Never.
वरद चतुर्थी
Comments