आयुर्वेद: औषधांचे तीन प्रकार
त्रिविधमौषधमिति-दैवव्यपाश्रयं, युक्तिव्यपाश्रयं, सत्वावजयश्च । तत्र दैवव्यपाश्रयं-मंत्रोषधिमणिमं- गलब ल्युपहारहोमनियमप्रायश्चित्तोपवासस्वस्त्ययनप्रणि- पातगमनादि । युक्तिव्यपाश्रयं-पुनराहारौषधद्रव्याणां योजना । पुनरहितेभ्योऽर्थेभ्यो मनोनिग्रहः ॥ ५८ ॥
औषधांचे तीन प्रकार - दैविक (देवतादिकांचे आराधनेपासून गुणास येणारी), कृत्रिम (युक्तीनें रोग्याची परीक्षा करून, वनस्पत्या- दिकांच्या औषधांपासून गुणास येणारी), व मानसिक (मनाच्या शुद्धतेने गुणास येणारी). त्यांत-मंत्र, गुप्त औषधी, रत्ने, मंगलकृत्य, बळी, उपहार, होम, नियमनिष्ठा, प्रायश्चित्त, उपवास, शांति, नमस्कार व तीर्थयात्रा ही पहिल्या प्रकारची साधनें होत. भोजन व औषधादि द्रव्ये यांची बरोबर योजना हीं कृत्रिम किंवा युक्तिव्यपाश्रय औषघांत मोडतात. व इंद्रियांना अहितकारक पदार्थांचे सेवन करूं न देण्या विषयी मनोनिग्रह व अनुकूल मनःशांति करणे हा प्रकार मानासिकांत (सत्वा- वजयांत ) येतो.
शरीरदोषप्रकोपे खलु शरीरमेवाश्रित्य प्रायशः त्रिवि- धमौषधमिच्छंति-अन्तःपरिमार्जनं, बहिःपरिमार्जनं शस्त्रप्रणिधानं चेति । तत्रान्तःपरिमार्जनं-पदन्तः शरीर- मनुप्रविश्यौषधमाहारजातव्याधीन् प्रमाष्टिं । यत्पुन- र्बहिः स्पर्शमाश्रित्याऽभ्यंग स्वेदप्रदेहपरिपेकोन्मर्दनाद्यै- रामयान् प्रमाष्टिं तद्बहिःपरिमार्जनम् । शस्त्रप्रणिधानं पुनश्च्छेदन भेदनव्यधनदारणलेखनोत्पाटनप्रच्छनसिव- नैषणक्षारजलौकसश्चेति ॥ ५९ ॥
औषधाचे तीन प्रकार - शरीरांतील वात, पित्त, कफ कुपित झाले असतां, शरीरास अनुसरून तीन प्रकारचें औषध पाहिजे असतेंः--
१ अन्त:परिमार्जन,
२ बहिः परिमार्जन,
व ३ शस्त्रक्रिया.
१ अन्त:परिमार्जन: त्यांत शरीराचे आंत जाऊन आहारापासून उत्पन्न झालेल्या व्याधींचा जीं औषधे फडशा उडवितात, त्यांस ' अन्तःपरिमार्जन' म्हणतात.
२ बहिः परिमार्जन: जीं औषधं शरीरास वर लावल्यानें- अभ्यंग, घाम, पोटीस, शेक किंवा चोळणे यांपासून रोगास घालवितात, त्यांस 'बहिःपरिमार्जन' म्हणतात.
३ शस्त्रक्रिया:शस्त्रक्रियेत तोडणें, मोडणें, भोंसकणें, फाडणें, ओरखडणे, बाहेर काढणें, फोडणे, शिवणे, सळई वगैरे घालून जखम शोधणे, क्षारानें जाळणें व जळवा लावणें इत्यादि कर्मे येतात.
संदर्भ - चरक संहिता
Comments