गोवर्धनपूजा-
मुख्य गोवर्धन पर्वत ज्यांना सन्निध आहे त्यांनी गोवर्धनाचीच पूजा करावी. तो सन्निध नसेल तर गोमयाचा अथवा अन्नराशीचा गोवर्धन करून त्यासह गोपालकृष्णाची पूजा करावी. पूजेविषथीं " श्रीकृष्णप्रीत्यर्थं गोवर्धनपूजनं गोपालपूजनत्मकं महोत्सवं करिष्ये " याप्रमाणें संकल्प करून " बलिराजे द्वारपालो भवानद्य भव प्रभो । निजवाक्यार्थनार्थाय सगोवर्धन गोपते।। "
या मंत्राने गोवर्धनासह गोपालाचे आवाहन करून स्थापना करावी. नंतर " गोपालमूर्ते विश्वेश शक्रोत्सवविभेदक । गोवर्धन कृतच्छत्र पूजां मे हर गोपते । गोवर्धनधराधार गोकुलत्राणकारक । विष्णुबाहुकृतच्छाय गवां कोटिप्रदो भव ॥" या मंत्रांनी श्रीगोपाल व गोवर्धन यांची षोडशोपचार पूजा करावी. यामध्ये जसें वैभव असेल त्या मानानें महानैवेद्य द्यावा. नंतर पूजेच्या अंगभूत प्रत्यक्ष धेनु अथवा मृत्तिकेची धेनु यांचे ठिकाणीं पूर्वोक्त मंत्रांनी गोपूजन करून वदन्तु०" या दोन ऋचांनीं घरांत सिद्ध केलेल्या चरूचा होम करावा. ब्राह्मणांना अन्न वगैरे व 'आ गावो अग्मन्प्रेत " गाय वगैरे यांचें दान करून गाईला तृणदान व गोवर्धनाला बलिदान करावे. नंतर गाईसहवर्त- मान आपण गाई, ब्राह्मण, होमाभि व गोवर्धनगिरि यांना प्रदक्षिणा करावी.
Comments