श्री गणेशाची नावे...
- Vedmata Gayatri J & D Kendra
- Aug 8, 2024
- 1 min read
Updated: Sep 16, 2024

श्री गणेशाला वक्रतुंड, विघ्नहर्ता, ब्रम्हणस्पति इत्यादि बरीच नावे आहेत. वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा असा अर्थ समजला जातो. पण तो चूक आहे. 'वक्रान तुण्डयति इति वक्रतुंडः' वेडेवाकडे चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुंड असा अर्थ आहे. वेदाला ब्रम्ह असे म्हणतात. वेदब्रम्ह-वेदब्रम्ह असे आपण म्हणतो, वेद म्हणजे मंत्र, या मंत्रांचा गणेश अधिपतिआहे. म्हणून याला ब्रम्हणस्पति म्हणतात.
गणाधिप, उमापुत्र, अघनाशन, विनायक, ईशपुत्र, सर्वसिद्धिप्रद,एकदन्त, ईभवक्त्र, मूषकवाहन, कुमारगुरव. ही नावे देखिल खूप सामर्थ्यशाली आहेत.
Comments