गणेशव्रताचा अधिकार कोणाकोणास असतो ? गणेशमूर्तिपूजन व विसर्जनविषयक शास्त्रसंकेत कोणते ? काही कारणाने गणेशमूर्तीचा अवयव
दुखावल्यास त्यास परिहार कोणता ?
कलियुगात गणेशोपासना शीघ्रफलदायी सांगितलेली असून ती पूजनात्मक व व्रतात्मक अशा दोन प्रकारे करता येते. पूजनात्मक गणेशोपासना ही नित्य व नैमित्तिक पद्धतींनी केली जाते. दररोजच्या पूजेतील मूर्तिस्वरूप वा पंचायतनातील नर्मद्यास्वरूप गणपतीचे पूजन हे नित्य प्रकारात, तर कोणत्याही मंगल प्रसंगी सुपारीवर अथवा नारळावर आवाहन करून होणारे गणपतीचे पूजन नैमित्तिक प्रकारात येते. व्रतात्मक गणेशोपसनेत संकष्टी चतुर्थी व विनायकीचतुर्थी ह्या मासिक पूजा, तर गणेशचतुर्थी व गणेशजयंती ह्या वार्षिक पूजा येतात...
शैवपंथात ज्याप्रमाणे पार्थिवशिवपूजा प्रचलित आहे, त्याप्रमाणेच गाणपत्य- प्रचलित आहे. पार्थिव केलेल्या मृत्तिकेच्या गणेशमूर्तीचे तळहातावर पूजन करून लगेचच विसर्जन करण्यात येते. पूर्वसूरींनी ह्या विविध पंथांचा व विचारप्रणालींचा योग्य समन्वय वार्षिक व्रतात्मक पूजांमध्ये घातलेला आहे. त्यानुसार पार्थिवगणेशपूजनाची जागा सद्यः कालीन भाद्रपद (मध्याह्रव्यापिनी) शु॥ चतुर्थी ह्या दिवशी केल्या जाणाऱ्या 'गणेशचतुर्थी' ह्या व्रताने घेतली. ह्या दिवशी प्रातःकाली मृत्तिकेच्या गणेशमूर्तीचे प्राणप्रतिष्ठापूर्वक षोडशोपचार- पूजन करणे व मध्याह्नी पंचोपचारपूजन करून मोदकयुक्त महानैवेद्य दाखवणे हा मुख्य व्रताचार असून त्यानंतर आपापल्या प्रथेनुसार यथाकाल मूर्तीचे विसर्जन केले जाते.
'गणेश' हा गणांचा अधिपती असल्यामुळे समाजातील संघशक्ती म्हणजेच गणशक्ती स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित व्हावी ह्या हेतूने लोकमान्यांनी त्यास सार्वत्रिक गणेशोत्सवाचे स्वरूप दिले. सद्यःकालीदेखील मोठ्या उत्साहाने ही संघशक्ती गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येते. त्या वेळी एखादे समाजोपयोगी उदात्त ध्येय समोर ठेवल्यास गणेशाच्या कृपेने त्याची खचितच पूर्ती होईल.
गणेशव्रतअधिकार-जगातील बहुसंख्य देशांत नानाविध नावानी के सम स्वरूपात पुजली जाणारी एकमेव देवता म्हणजे गणेस होय. असे की, सर्व जातिधर्मातील स्त्री-पुरुषांना गणेशव्रताचा अधिकार आहे म्हणून प्रत्येक कुटुंबात होणे क्रमप्राप्त असते. ह्या संदर्भात धर्मसिंधुमधील पुढील उ ठरते, 'विभक्तधनाना भ्रात्रादीनां सर्व धर्माः पृथगेव । अर्थात कुल बंधू एकत्र राहत असतील, म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) (चूल) एकत्र असल, तर सर्वांनी एकत्र मिळून एक मूर्ती पुजली तरी चालते एखाद्याचा व्यास व पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्त असेल त्या त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशव्रत करावे. पण एकत्र कुटुंब असूनही करी व्यवसायानिमित्ताने वा घराच्या जागेच्या अडवर्णामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणाले वडील व भुले तसेच सख्खे भाऊ निरनिराळ्या ठिकाणी राहत असतात, त्या वेळी कुलधर्म-कुलाचार ह्या निमित्तांनी सर्वांनी आपापल्या कुटुंबीयांसमवेत एकल याने पाण काही कारणाने एकत्र उपस्थित राहणे असंभव असेल तर तेच विधी आपापल्या घरी निदान प्रातिनिधिक स्वरूपात तरी करावेत. तथापि जेव्हा अशा कुटुंबातील मुले जाणती होतील तेव्हा मात्र कुलधर्म कुलाचारांचे स्वतंत्र पालन करावे. अन्यथा ह्या सर्व धार्मिक कार्याचा लाभ फक्त एकालाच मिळत राहतो व बाकीचे नकळत वंचित राहतात. नंतर त्यांची मुलेही पितृपरंपरेस 'एकनिष्ठ (?)' राहून वरील धार्मिक कार्यापासून सोईस्कररीत्या फारकत घेतात व पुढील पुढील पिट्ट्यांना आपल्या कुलदेवतांच्या नावांचाही विसर पडतो.
गणेशमूर्ति-पूजनविषयक.शास्त्रसंकेत अंगुष्ठपर्वमानात् सा वितस्ति यावदेव - तु । गृहेषु प्रतिमा कार्या नाधिका शस्यते बुधैः ॥' ह्या शास्त्रवचनानुसार गेल्याच्य उंचीपेक्षा लहान व प्रादेशापेक्षा (टिपेक्षा) मोठ्या अशा धातूच्या किंवा मूलिकेच्या मूर्ती घरी पुजता येत नाहीत. ह्यास्तव गणेशपूजनासाठी केव्हाही पूजाकर्त्यांच्या टिचेपेक्षा मोठी मूर्ती घेऊ नये. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवात, केवळ हौस म्हणून केलेली मोठी मूर्ती प्रतिष्ठापना न करता केवळ शोभेची मूर्ती म्हणूनच ठेवावी आणि लहान मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून तिचे पूजन व विसर्जन करावे.
पार्थिव गणेशमूर्ती ही शुद्ध मृत्तिकेपासून तयार केली जाणे विहित असते. तथापि सद्यःकाली प्लास्य, शाडू आणि अन्य तत्सम पदार्थांपासून गणेशमूर्ती तयार केली जाते. पण त्याचबरोबर जे विविध रासायनिक रंग व प्राणिज पदार्थ (वार्निश) वापरले जातात ते पर्यावरणशास्त्रदृष्ट्या व आरोग्यदृष्ट्या अपायकारक असू शकतात. म्हणून अशा प्रकारे केलेल्या मूर्तीची पूजा करणे शास्त्र सम्मत नसते, ह्यास्तव ह्या गोष्टी टाळण्याच्या बाबत आग्रही असावे. त्या दृष्टीने काही प्रांतात शेतातील मातीपासून तयार केलेला 'गणोबा' आणून त्याची प्रतिष्ठापना केली जाते. 'गणोबा' हे गणपतीचेच रूप असल्यामुळे त्याचीच प्रतिष्ठापना व पूजा करणे हे अत्यंत स्वागतार्ह व अनुकरणीय ठरते. विशेषत नव्याने व्रतप्रारंभ करणाऱ्या व्रतौनी ह्या गोष्टीचा जरूर विचार करावा.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आकाराने विशाल मूर्ती तयार न करता शास्त्र आकाराच्या मूर्तीची स्थापना करणे ही काळाची गरज आहे. तथापि मोठ्या मूर्तीच्या बाबतीत आग्रही भूमिका असेल तर कायमस्वरूपी ठेवण्यासाठी शोभेची मूर्ती आणून लिये गौम्य प्रकारे जतन करावे आणि केवळ गणेशोत्सवाच्या कालावधीत त्यांचे सादरीकरण कराचे शास्त्रदृष्ट्या शोभेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व तिचे नित्यपूजनादी उपचार करण्याची काहीच आवश्यकता नसल्यामुळे अशा मूर्तीवर वर्षभर कोणतेही पूजनात्मक उपचार केले नाहीत तरी चालतात.
गणेशमूर्ति विसर्जनविषयक शास्त्रसंकेत - पार्थिव मूर्तीमधील प्राणप्रतिष्ठेनंतर आलेले देवत्व हे त्या दिवसापुरतेच असते. म्हणूनच कोणत्याही देवाची पार्थिवपू केल्यावर त्या मूर्तीचे विसर्जन त्याच दिवशी किंवा फार तर दुसऱ्या दिवशी होणे हे सर्वधैव इष्ट असते. तथापि गणेशचतुर्थीच्या बाबतीत विविध कारणांस्तव मूर्तिविसर्जन लांबणीवर टाकले जाते. त्यापैकी पहिले कारण म्हणजे पाचव्या किंवा सहाव्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीविसर्जन असल्यामुळे गौरीबराबर गणपतीचे विसर्जन केले जाते. अशीच प्रथा बहुते ठिकाणी असून ज्यांच्या घरी गोरीव्रत आहे त्यांच्या बाबतीत ही प्रथा समर्थनीय ठरते दुसरे कारण म्हणजे दहाव्या दिवशी अनंतचतुर्दशी येत असल्यामुळे त्या दिवशीदेखील काही ठिकाणी परगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. गणेशचतुर्थी व अनंतचतुर्दशी ही पूर्णतया भिन्न देवतांची व्रते असल्यामुळे त्यांची एकमेकाशी सांगड घालता येत नाही. घरगुती गणेशव्रताच्या निमित्ताने दहा दिवस विविध धार्मिक कार्यांचे मनपूर्वक आयोजन केलेले असल्यास दहाव्या दिवशीही विसर्जन करणे समर्थनीय ठरेल. पण एवढे दिवस गणपती ठेवणे काही कारणास्तव सोयीचे ठरत नसेल, तर केवळ रूढीपोटी गणेशविसर्जन लावणीवर टाकणे योग्य नाही. परंपरेने घरात गणेशोत्सव पाच सहा किंवा दहा दिवसांचा असला तरी तो आपल्या इच्छेनुसार व सोयीप्रमाणे एक, दीड, तीन इत्यादी दिवसाचा करण्यास शास्त्राची कोणतीही हरकत येत नाही. या बाबतीत कोणतेही भय अथवा सदेह मनी बाळगू नये. तिसरे कारण म्हणजे काही कुटुंबात घरात गर्भिणी असताना गणपतीचे विसर्जन करत नाहीत. गर्भिणीधर्म व गणेश ह्यांचा अर्थाअर्थी कोणताही संबंध नाही. गर्भिणी प्रसूत होईपर्यंत गणपतीची मूर्ती कोणतेही उपचार व विधी न करता झाकून अडगळीत ठेवणे हे केवळ शास्त्रविरुद्ध नव्हे, तर ते अज्ञानमूलक श्रद्धेतून फोफावलेले सांस्कृतिक विडंबन आहे. म्हणून घरात गर्भिणी असताना सर्व कुलधर्म कुलाचार यथास्थित, नेहमीप्रमाणे व नेहमीच्या कालावधीतच करणे युक्त ठरते. ह्यास्तव प्रसूतीची वाट न पाहता ठरल्याप्रमाणे गणेशविसर्जन करणे हे.. शास्त्राला धरून आहे.
शास्त्रानुसार विसर्जन हे वाहत्या पाण्यात होणे आवश्यक असल्यामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन जलाशयात (तलाव, विहिरी इत्यादी ठिकाणी) करू नये, अन्यथा त्या जलाशयातील पाणी प्रदूषित तर होतच, पण त्यातील नैसर्गिक उमाळे बुजून जातात व कालांतराने तो जलाशय निरुपयोगी ठरतो, गणेशमूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यात करणे शक्य नसल्यास नागपंचमी, बेंदूर (पोळा), हरितालिका, पार्थिवशिवपूजा, जन्माष्टमी इत्यादी व्रतांमधील मृत्तिकेच्या मूर्तीप्रमाणेच शेतात, घरातील बागेत किंवा तुळशीवृंदावनात विसर्जन करणे इष्ट ठरते.
गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर सोहेरसूतक आले असता घरातील ब्रह्मचारी मुलाकडून अथवा आप्ताकडून उत्तरपूजा करून गणेशविसर्जन करावे. जननाशौच (सोहेर) वा मृताशीच (सूतक) काळात हे व्रत आल्यास घरातील ब्रह्मचारी मुलाकडून, आप्ताकडून वा पुरोहिताकडून गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पंचखाद्याचा नैवेद्य दाखवावा. अशा वेळी गणेशमूर्तीचे लगेचच विसर्जन करावे किंवा सोहेरसूतकाच्या कालावधीनुसार वा सोयीनुसार गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. मात्र ह्या नित्य व्रतामध्ये शक्यतो खंड होऊ देऊ नये.
गणेशमूर्तीचा अवयव दुखावल्यास त्याविषयीचे शास्त्रसंकेत -
गणेशमूर्तीच्या एखाद्या अवयवास इजा झाल्यास त्या घरात घबराटीचे वातावरण निर्माण होते. पण शास्त्रसंकेत ज्ञात झाल्यास ह्या गोष्टीचा फारसा बाऊ करण्याचे काहीच कारण नाही हे कळून येते. शास्त्रसकेतानुसार प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी किंवा शेवटच्या दिवशी मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षता वाहिल्यानंतर त्या मूर्तीचा अवयव दुखावल्यास विचार करण्याचे काहीच कारण नाही. कारण दोन्ही वेळी मूर्तीत देवत्व नसते प्राण प्रतिष्ठेच्या पूर्वी मूर्तीचा अवयव दुखावल्यास ती मूर्ती बाजूला ठेवून दुसरी मूर्ती पुजावी व दोन्ही एकदमच विसर्जन करावे. गणपती विसर्जनासाठी नेताना मूर्तीचा अवयव दुख मनात कोणताही किंतू न आणता नेहमीप्रमाणे त्या मूर्तीचे विसर्जन करावे.
प्राणप्रतिष्ठा झाल्यावर महानैवेद्यातील महारतीनंतर गणेश मूर्तीस इजा पोचल्यास दोष नाही. कारण शास्त्रानुसार पार्थिवपूजेत मूर्तीमधील देवत्व त्या दिवशी आरती
पर्यंतच असते. त्यामुळे अशा प्रसंगी आरतीनंतर मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षता वाहून तिचे विस करावे. या वेळी मन शांतीसाठी देवासमोर सुपाचे नीराजन लावून ॐ गं गणप नमः।' ह्या मंत्राचा यथासंख्य जप करावा. परंतु गणेशचतुर्थीदिवशी प्राणप्रि झाल्यानंतर पूजा करताना अकल्पित कारणाने मूर्तीचा अवयव दुखावल्यासा पूर्णतया भगे पावल्यास दुसरी मूर्ती पुजावी. मात्र अशा प्रसंगी कोणत्याही परिस्थितं पाचरून, धीर सोडून सैरभैर होऊ नये. कारण त्यामुळे विवेकबुद्धी क्षीण होऊन मानि दुर्बलता येऊ शकते, अशा वेळी प्रथम 'ॐ गं गणपतये नमः ।' ह्या मंत्राचा एक सहस करावा. तसेच, 'विघ्न येऊ देऊ नकोस!' अशी प्रार्थना विघ्नहर्त्या गणेशास करावा यथावकाश अद्भुतदर्शनशांती किंवा विष्णुसहस्रनाम आवृत्त्या करण्याचा मनोमन संकर यथावकाश कुलपुरोहिताच्या मार्गदर्शनाखाली 'अद्भुतदर्शनशांती' अक्ष 'गणेश-व्रतांतर्गत दुश्चिह्नसूचित सकलारिष्ट निरसनपूर्वकं सकलकुटुंबाना क्षेत्र दीर्घायुः सिद्धार्थ श्रीमहाविष्णुप्रीत्यर्थं विष्णुसहस्रनाम द्वादशावृत्ति-पठनास कर्म करिष्ये।।' असा संकल्प करून विष्णुसहस्रनामाच्या बारा आवृत्त्या कराव्या जपाच्या वेळी तुपाचा दिवा लावून ठेवावा. पठन पूर्ण झाल्यानंतर तो दिवा घेऊ सुवासिनीने घरातील सर्व लोकांना ओवाळावे.
दुसऱ्याने गणपती दिल्याखेरीज गणेशव्रत व अनंतदोरक सापडल्या- खेरीज अनंत नव्याने करता येत नाही हा समज कितपत शास्त्रसंमत आहे ?
समाजात अंधपरंपरा कोणत्या घरापर्यंत जोपासली जाऊ शकते हे वरील दोन गोष्टीवरून दिसून येते. वास्तविक अन्नपाक व द्रव्यकोश ह्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्य प्रत्येक घरात कुलधर्म कुलाचारांचे स्वतंत्रपणे पालन होणे जरुरीचे असते. ज्याप्रमाणे एकमार्ग व एकच गती असेल तर पावसात एकच छत्री दोघांना उपयोगी पडते, पण गती मार्ग ह्यांपैकी एक जरी भिन्न असेल तर एक छत्री उपयोगी पडत नाही, त्याप्रमाणे नोकरीच्या निमित्ताने अथवा अन्य कोणत्याही कारणाने पिता-पुत्र, भाऊ-भाऊ विभक्त झाले तर त्यांनी सर्व कुलधर्म व कुलाचार स्वतंत्र करावेत असा शास्त्रदंडक आहे. वंशपरंपरेने उपरोक्त व्रते चालत आलेली असतील तर पित्याचे व्रत पुत्रांना आपोआपच लागू होते.. त्यासाठी गणेशमूर्ती दुसऱ्याने देण्याची व अनंतदोरक सापडण्याची आवश्यकता नसते.. तसेच नव्यानेच ही व्रते घेणाऱ्यांनाही ह्या गोष्टींची आवश्यकता नसते. कारण ही दोन्हीही व्रते अनुक्रमें नित्य वा नैमित्तिक (कामनिक) प्रकारातील असल्यामुळे कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही वर्षी दिनशुद्धी पाहून त्याची सुरुवात करता येते.
काही प्रांतांत जबरदस्तीने गणेशव्रत लादण्याचा प्रकार अस्तित्वात आहे. ज्या घरी गणेशव्रत नसते अशा घराशी संबंधित नातलग गणेशचतुर्थीच्या भल्या पहाटेच गणपती, पूजेचे साहित्य, शोभेच्या माळा, मोदक इत्यादी त्या घराच्या पायरीवर नेऊन ठेवतात. अशा वेळी इच्छेविरुद्ध गणेशव्रत चालू करावे लागते. पण ज्यांना गणेशाची चिरंतन कृपा हवी असेल त्यांनी अशी पाळी न येऊ देता हे व्रत किमान एक दिवस तरी करावे. ज्यांना हा लाभ नको असेल वा काही कारणाने हे व्रत आचरणे अशक्य असेल, त्यांनी आपल्या मनाविरुद्ध व जबरदस्तीने इतरांनी घरासमोर ठेवलेला गणपती सर्व साहित्यासह वाहत्या जलात विसर्जन करावा. कारण त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली नसल्यामुळे असे करण्यात दोष येत नाही. अनंतव्रताच्या बाबतीतदेखील ज्याला काही कामनेने अनंतव्रत करण्याची इच्छा उद्भवेल त्याने अनंताचा दोरक स्वतः आणून अनंतव्रताचा प्रारंभ करावा. त्यासाठी अनंतदोरक सापडण्याची काहीच आवश्यकता नसते.
"कृण्वंतो विश्वमार्यम्' असे ब्रीद बाळगणारा हिंदू धर्म हा वैश्विक धर्म असल्यामुळे धर्माचरण लादणे ही संकल्पनाच ह्या धर्मात नाही. ह्यास्तव कदापिही अशा अज्ञानमूलक व अंधश्रद्धाजनक रूढींच्या आहारी जाऊ नये.
Comments