निर्णयसिंधु-
कार्तिकमासामध्ये आकाशदीप सांगतो - निर्णयामृतांत पुष्करपुराणांत - "तुलासंक्रांतींत तिलतैलानें सायंकालीं एक महिना हरीला जो आकाशदीप देईल तो मोठी लक्ष्मी व रूप सौभाग्य संपत्ति पावेल. त्या आकाशदीपाचा विधि-हेमाद्रींत आदिपुराणांत-"सूर्य अस्ताचलाप्रत गेला असतां गृहाजवळ एकपुरुष उंच यज्ञस्तंभासारखें यज्ञियत्र- क्षाचें (खदिरादिकाचें) काष्ठ भूमींत पुरून त्याचे मस्तकावर दोन हात लांबीच्या चार पट्ट्या त्या, मध्यभागीं यवपरिमित एक अंगुल लांब असें छिद्र पाडलेल्या अष्टदलाकृति बसवाव्या. तीं अष्टदलें आठ दिशांस येतील असें दीपयंत्र करावें, त्याच्या कर्णिकेमध्ये मोठा दीप लावावा. आणि आठ दलांवर आठ दीप लावावे. ते दीप धर्माय, हराय, भूम्यै, दामो- दाय, धर्मराजाय, प्रजापतिभ्यः, पितृभ्यः, तमःस्थितेभ्यः प्रेतेभ्यः ह्या नाममंत्रांनीं समर्पण करावे". अप- रार्कात तर दुसरा मंत्र सांगितला, तो असाः- "दामोदाय नभसि तुलायां दोलया सह ॥ प्रदीपं ते प्रयच्छामि नमोनंताय वेधसे."
Comments