अनुच्छिष्ट ध्यानाची कल्पना
पुंडरीक :
"परंतु आता जर तुझे 'हृदयपरिवर्तन' झाले असेल आणि तू माझ्या प्रेमासाठीच इथे आला असशील, तर मी जे जे म्हणेन ते ते करण्याचे 'भाषदान' मला अगोदर द्यावे; तरच मी पुढे बोलेन !" पुंडरिकाचे हे बोलणे ऐकताच देवाने 'तथास्तु' म्हटले. तसे वचन मिळताच पुंडरीक तत्काळ उद्गारला, "माझी पहिली मागणी देवाचे आहे की, मी 'उसटलिया' (उष्ट्या) ध्यानाचे दर्शन कदापि घेणार नाही आणि दुसरी मागणी अशी की, मी जेव्हा जेव्हा तुला पाहू इच्छीन, तेव्हा तेव्हा तू माझ्यासपीय असायला हवे. हे जर तुला मान्य असेल, तर इथे थांबावे, अन्यथा खुशाल स्वस्थापन परत जावे." देवाने या दोन्ही अटी तत्काळ मान्य केल्या. यानंतर पुंडरिकाच्या मनाती प्रश्न उपस्थित झाला, की देवाचे कोणते ध्यान आपण अपेक्षावे? -
जरि शृंगारेसर्सी धरावें ध्यान । तरि कृष्णावतारीं तो दाविला पूर्ण । वीररसें श्रीरामचंद्रध्यान । फरशराम रौद्ररसीं ।। वामनावतार हास्यरसें । नृसिंह शोभे रस बिभछें । वाराह अवतार अद्भुतरसें । शांतरसें कूर्मावतार ।। मछावतारी भयानकरस । एवं पाहातां खर्चले आठहि रस । मग करुणारसें धरूनि निःशेष । पांडुरंगध्यान ।।
पुंडरिकाला देवाचे 'उष्टे' ध्यान नको होते. मत्स्य (भयानक), कूर्म (शांत), वराह (अद्भुत), नृसिंह (बीभत्स), वामन (हास्य), परशुराम (रौद्र), रामचंद्र (वीर) आणि कृष्ण (शृंगार) या क्रमाने आठ अवतारांनी अष्टरसांची ध्याने प्रकट केली होती. यांहून वेगळे ध्यान पुंडरिकाला हवे होते. म्हणून देवाने आठव्यानंतरच्या (अर्थात् नवव्या) अवताराचे ध्यान पांडुरंगरूपाने स्वीकारले आणि ते करुणारसाने अधिष्ठित केले-
टाकुनि शंखचक्रगदापद्म । कटीं कर ठेविले निभ्रम । मस्तकींचा मुकुट ठेवूनि उत्तम । लिंग शोभे निजभाळी ॥ विटेवरी समतापदें विराजमान । ऐसें निष्कळंक धरूनि पांडुरंगध्यान । पुंडरीका पाहे पां आतां फिरोन । अनुच्छिष्टध्यान माझे ॥
पुंडरीक कथेचा उत्कट दृष्टान्त
पुंडरीक मातृपितृसेवेत रममाण होऊन, आपल्या आगमनाची मुळीच दखल घेत नाही, असे पाहून जगदीशाने 'गोपाळवेष धरून सुरस वेणुवादन केले', परंतु तरीही पुंडरीकाने आपले सेवाकार्य सोडले नाही. त्याने देवाला बसवण्यासाठी 'इट दिली गारून, 'इतकेच घडले. या प्रकारामुळे देवाला मोठे 'साकडे' पहले, 'मी वा पितृसेवातप ढाळीन । म्हणोनि आलों इंवेसी पण करून ।' याची देवाला आठवण झाली आणि त्याने आपले 'येणें व्यर्थ केलें'. या पुढे माघार घेण्यावाचून आता देवाला गत्यंतर उरले नाही. , या जाणिवेने देव अस्वस्थ झाला. मग अंतरीं देवें गजबजोन । घाबिरेपणें बोलिलें वचन । पुंडरीका माग माग तुज प्रसन्न । सर्वस्वें जालों आजीं ॥
देवाने वरदानाची एवढी सिद्धता प्रकट केल्यानंतरही पुंडरीक यत्किंचितही विचलित झाला नाही 'पितृसामथ्यै - त्याला ईश्वरी वरदानाची मातबरी मुळीच वाटली नाही. उलट मज काय कसे न्यून?' असा त्याने देवालाच प्रश्न विचारला आणि तूं सदाचा भिकारी परतंत्र होऊन । दारोदारी हिंडसी ।
असे त्याचे उणे काढले. या आपल्या विधानाच्या पुष्टीसाठी आणि देवाचे अन्य अनेक 'अपराध' त्याला पटविण्यासाठी पुंडरिकाने त्याच्या अवतारचरित्रांतील अनेक कथांचे दाखले एकापाठोपाठ एक सादर केले. 'ब्राह्मणाचे बाळ' बनून बळीकडे भौक मागणारा, त्याला पाताळी घालून त्याचे दार राखणारा, मधुकैटभांच्या मेदमांसाने भूगोल रचणारा, गरुडाला वरदान देऊन सदैव त्याच्या पाठीवर आरूढ होणारा, प्रल्हादाला प्रसन्न होऊन त्याच्या पित्याचे पोट चिरणारा, महीरावणाची नरडी दडपून त्याला हनुमंताकरवी मारविणारा, पुरोचनाचे घर कपटाने घेऊन त्याची स्त्री होऊन त्याला मारणारा, वसुदेव-देवकीच्या पोटी जन्म घेऊन त्यांना कारागृहात पीडणारा, अपराध नसताना वानरांना युद्धात मरण्याचा प्रसंग आणणारा, पित्याला अघोर नरकपतन भोगायला लावून विश्वमारक निशाचरांना स्वपदी बसवणारा - असा हा 'गुन्हेगार' देव आपल्याला काय देणार, असा प्रश्न उपस्थित करण्याचे धाष्र्ण्य पुंडरिकाने दाखवले. त्याने आईच्या (रेणुकेच्या) शिरच्छेदापासून सतीच्या (वृंदेच्या) पातिव्रत्य-भंगापर्यंत देवांचे आणखीही अनेक 'गुन्हे' त्याला निर्भयपणे ऐकवले आणि वर असे आव्हान
पुंडरिकाने टाकलेल्या विटेवर अखंड उभे असलेले हे ध्यान विष्णूच्या नवव्या अवताराचे आहे. ते अनुच्छिष्ट म्हणजे पूर्वी कधीही न उष्टावलेले आहे, ते करुणारसाने युक्त आहे आणि ते हरिहरसमन्वित आहे, ही दिनकरस्वामींची पांडुरंगरूपाविषयीची धारणा लक्षणीय आहे, यात मुळीच संशय नाही. आपण पितुसेवेचा दृष्टान्त देऊन आनंद दिनकरस्वामींनी अखेरीस व्यक्त केला आहे आणि त्यानंतर पारंपरिक पुंडलीक असलेला परंतु कथनाच्या ओघात -
सुटाच, स्वतंत्र दृष्टान्ताच्या स्वरूपात नोंदविला आहे की ते वाराणसीचिया पंचक्रोशाभीतरीं । कुकुट ब्राह्मण मातृपितृसेवा करी । त्याचिया स्मरणमात्रै निर्धारीं । दोष जाती जन्मांतरीचे ॥तत्काळ उद्गारला, "माझी पहिली मागणी देवाचे आहे की, मी 'उसटलिया' (उष्ट्या) ध्यानाचे दर्शन कदापि घेणार नाही आणि दुसरी मागणी अशी की, मी जेव्हा जेव्हा तुला पाहू इच्छीन, तेव्हा तेव्हा तू माझ्यासपीय असायला हवे. हे जर तुला मान्य असेल, तर इथे थांबावे, अन्यथा खुशाल स्वस्थापन परत जावे." देवाने या दोन्ही अटी तत्काळ मान्य केल्या. यानंतर पुंडरिकाच्या मनाती प्रश्न उपस्थित झाला, की देवाचे कोणते ध्यान आपण अपेक्षावे? -
जरि शृंगारेसर्सी धरावें ध्यान । तरि कृष्णावतारीं तो दाविला पूर्ण । वीररसें श्रीरामचंद्रध्यान । फरशराम रौद्ररसीं ।। वामनावतार हास्यरसें । नृसिंह शोभे रस बिभछें । वाराह अवतार अद्भुतरसें । शांतरसें कूर्मावतार ।। मछावतारी भयानकरस । एवं पाहातां खर्चले आठहि रस । मग करुणारसें धरूनि निःशेष । पांडुरंगध्यान ।।
पुंडरिकाला देवाचे 'उष्टे' ध्यान नको होते. मत्स्य (भयानक), कूर्म (शांत), वराह (अद्भुत), नृसिंह (बीभत्स), वामन (हास्य), परशुराम (रौद्र), रामचंद्र (वीर) आणि कृष्ण (शृंगार) या क्रमाने आठ अवतारांनी अष्टरसांची ध्याने प्रकट केली होती. यांहून वेगळे ध्यान पुंडरिकाला हवे होते. म्हणून देवाने आठव्यानंतरच्या (अर्थात् नवव्या) अवताराचे ध्यान पांडुरंगरूपाने स्वीकारले आणि ते करुणारसाने अधिष्ठित केले-
टाकुनि शंखचक्रगदापद्म । कटीं कर ठेविले निभ्रम । मस्तकींचा मुकुट ठेवूनि उत्तम । लिंग शोभे निजभाळी ॥ विटेवरी समतापदें विराजमान । ऐसें निष्कळंक धरूनि पांडुरंगध्यान । पुंडरीका पाहे पां आतां फिरोन । अनुच्छिष्टध्यान माझे ॥
पुंडरीक कथेचा उत्कट दृष्टान्त
पुंडरीक मातृपितृसेवेत रममाण होऊन, आपल्या आगमनाची मुळीच दखल घेत नाही, असे पाहून जगदीशाने 'गोपाळवेष धरून सुरस वेणुवादन केले', परंतु तरीही पुंडरीकाने आपले सेवाकार्य सोडले नाही. त्याने देवाला बसवण्यासाठी 'इट दिली गारून, 'इतकेच घडले. या प्रकारामुळे देवाला मोठे 'साकडे' पहले, 'मी वा पितृसेवातप ढाळीन । म्हणोनि आलों इंवेसी पण करून ।' याची देवाला आठवण झाली आणि त्याने आपले 'येणें व्यर्थ केलें'. या पुढे माघार घेण्यावाचून आता देवाला गत्यंतर उरले नाही. , या जाणिवेने देव अस्वस्थ झाला. मग अंतरीं देवें गजबजोन । घाबिरेपणें बोलिलें वचन । पुंडरीका माग माग तुज प्रसन्न । सर्वस्वें जालों आजीं ॥
देवाने वरदानाची एवढी सिद्धता प्रकट केल्यानंतरही पुंडरीक यत्किंचितही विचलित झाला नाही 'पितृसामथ्यै - त्याला ईश्वरी वरदानाची मातबरी मुळीच वाटली नाही. उलट मज काय कसे न्यून?' असा त्याने देवालाच प्रश्न विचारला आणि तूं सदाचा भिकारी परतंत्र होऊन । दारोदारी हिंडसी ।
असे त्याचे उणे काढले. या आपल्या विधानाच्या पुष्टीसाठी आणि देवाचे अन्य अनेक 'अपराध' त्याला पटविण्यासाठी पुंडरिकाने त्याच्या अवतारचरित्रांतील अनेक कथांचे दाखले एकापाठोपाठ एक सादर केले. 'ब्राह्मणाचे बाळ' बनून बळीकडे भौक मागणारा, त्याला पाताळी घालून त्याचे दार राखणारा, मधुकैटभांच्या मेदमांसाने भूगोल रचणारा, गरुडाला वरदान देऊन सदैव त्याच्या पाठीवर आरूढ होणारा, प्रल्हादाला प्रसन्न होऊन त्याच्या पित्याचे पोट चिरणारा, महीरावणाची नरडी दडपून त्याला हनुमंताकरवी मारविणारा, पुरोचनाचे घर कपटाने घेऊन त्याची स्त्री होऊन त्याला मारणारा, वसुदेव-देवकीच्या पोटी जन्म घेऊन त्यांना कारागृहात पीडणारा, अपराध नसताना वानरांना युद्धात मरण्याचा प्रसंग आणणारा, पित्याला अघोर नरकपतन भोगायला लावून विश्वमारक निशाचरांना स्वपदी बसवणारा - असा हा 'गुन्हेगार' देव आपल्याला काय देणार, असा प्रश्न उपस्थित करण्याचे धाष्र्ण्य पुंडरिकाने दाखवले. त्याने आईच्या (रेणुकेच्या) शिरच्छेदापासून सतीच्या (वृंदेच्या) पातिव्रत्य-भंगापर्यंत देवांचे आणखीही अनेक 'गुन्हे' त्याला निर्भयपणे ऐकवले आणि वर असे आव्हान
पुंडरिकाने टाकलेल्या विटेवर अखंड उभे असलेले हे ध्यान विष्णूच्या नवव्या अवताराचे आहे. ते अनुच्छिष्ट म्हणजे पूर्वी कधीही न उष्टावलेले आहे, ते करुणारसाने युक्त आहे आणि ते हरिहरसमन्वित आहे, ही दिनकरस्वामींची पांडुरंगरूपाविषयीची धारणा लक्षणीय आहे, यात मुळीच संशय नाही. आपण पितुसेवेचा दृष्टान्त देऊन आनंद दिनकरस्वामींनी अखेरीस व्यक्त केला आहे आणि त्यानंतर पारंपरिक पुंडलीक असलेला परंतु कथनाच्या ओघात -
सुटाच, स्वतंत्र दृष्टान्ताच्या स्वरूपात नोंदविला आहे की ते वाराणसीचिया पंचक्रोशाभीतरीं । कुकुट ब्राह्मण मातृपितृसेवा करी । त्याचिया स्मरणमात्रै निर्धारीं । दोष जाती जन्मांतरीचे ॥
Comments