Narak Chaturdashi नरक चतुर्दशी
नरक चतुर्दशी- निर्णयसिंधु
कार्तिककृष्णचतुर्दशीचेठायीं प्रभातकाळीं चंद्रोदयीं तैलाभ्यंग करावा. तें सांगतो हेमाद्रींत व निर्णयामृतांत भवि- ष्योत्तरांत—“कार्तिककृष्णपक्षामध्यें चतुर्दशीचेठायीं चंद्रोदयीं नरकास भिणारांनी अवश्य स्नान करावे." मदनरत्नांत ‘इनोदये’ यास्थानीं ‘विधूदये’ असा पाठ आहे. 'दिनोदये' अशा पाठावरून सूर्योदयानंतर तीन मुहूर्तांत स्नान करावें, असे सांगणारे गौड व त्यांचे अनुयायी अजाणतेच म्हटले पाहिजेत. "कार्तिकाच्या कृष्णपक्षांत त्रयोदशीयुक्त चतुर्दशीचे ठायीं उषःकालीं प्रयत्नाने स्नान करावें” असें वचन आहे. स्मृतिदर्पणांतही “आश्विनकृष्णचतुर्दशी स्वाती नक्षत्रानं युक्त असतां ऐश्वर्येच्छू नरांनीं प्रातःकाळीं सुगंधितैलाने अभ्यंग करून स्नान करावें." पृथ्वी चंद्रोदयांत पाद्मांत – “आश्विन कृष्णपक्षाच्या चतुर्दशीस चंद्रोदयीं नरकास भिणारानें तिळांचे तेल लावून स्नान करावें." वरील वचनांत 'कर्तव्यं मंगलस्नानं नरैर्निर- यभीरुभिः' असा कालादर्शात पाठ आहे. मंगलस्नान करावें, असा अर्थ. ह्यावरील दोन्हीं वचनांमध्ये आश्विन असे पद आहे तें अमावास्यान्त मास घेऊन सांगितलें आहे. तसेच "दीपावलीची चतुर्दशी प्राप्त झाली म्हणजे तैलांत लक्ष्मी व उदकांत गंगा असते, म्हणून तैलाभ्यंग करून प्रातःस्नान जो करील त्याच्या दृष्टीस यमलोक पडत नाहीं.
चंद्रोदयी स्नान करावे." असे वचन येथेच वर सांगितले आहे. पूर्वदिवशीच चंद्रोदयव्यापिनी असतां पूवाच घ्यावी. परदिवशीच चंद्रोदयव्यापिनी असतां पराच ध्यावी. दोन्हीं दिवशीं चंद्रोदयीं नसेल तर अरुणोदयव्यापिनी घ्यावी. कारण, "पक्ष प्रत्यूषसमये." म्हणजे वरील वचनांत उषःकाली (अरुणोदयीं ) स्नान करावें, असें सांगितलें आहे. आणि "आश्विन- मासी कृष्णचतुर्दशीस रात्रीच्या चतुर्थप्रहरी तैलाभ्यंग विशेष फलदायक आहे.” असे सर्वज्ञनारायणवचन पुढं सांगाव- याचेही आहे. दोन्ही दिवशी अरुणोदयव्यापिनी नसेल तर चतुर्दशीचा जितका क्षय असेल तितका पूर्वदिवसांत मिळवून तितकी चतुदशी पूर्वदिवशी आहे असे समजून त्या काली वस्तुतः त्रयोदशीमध्येच अभ्यंग करावा, असे दिवोदास सांगतो. केचित् ग्रंथकार असे करण्याविषयीं साधकवचन देखील सांगतात - "जितक्या घटी तिथिक्षय झालेला असेल तितकी तिमि त्या तिथीच्या आदी नसली तरी कमाविषयी घ्यावी. आणि जितकी वृद्धि असेल तितकी परदिवशी घ्यावी. " सांगणे मंद आहे. कारण, इतर वचनानें पूर्वी ग्रहण अप्राप्त असतां हैं वचन पूर्वदिवस ग्रहण करण्याविषय सांगत नाही. जर हे वचन पूर्वदिवस ग्रहण करण्याविषयीं सांगेल तर नक्त, एकभक्त, जन्माष्टमी इत्यादिकांविषयीं दोन दिवस कर्मकालव्याप्ति नसतां सर्वत्र ठिकाण पूर्वदिक्साला ग्रहण करण्याचा प्रसंग येईल ! तर ज्या एकभक्तादि व्रताचे ठायीं दोन दिवस कर्मकालव्याप्ति नसतां इतर वाक्याने किंवा न्यायाने पूर्वदिवस ध्यावा म्हणून सांगितलें आहे, त्या ठिकाणी मुख्यकाली त्या तिथीचा अभाव असला तरी त्याच काली त्या कमीचं अनुष्ठान बोध करणारें हैं वचन आहे. ह्या प्रकृतस्थली त्रयोदशी ग्रहण करण्याविषयीं वचन नसल्यामुळे हे वचन एथें लागू होत नाहीं, म्हणून हें कांहींतरी सांगणे आहे. तेर्णेकरून अरुणोदय नसेल तर रात्रीच्या चतुर्थप्रहरांत असणारी चतुर्दशी घ्यावी. म्हणूनच सर्वज्ञनारायण सांगतो -"आश्विनमास कृष्णचतुर्दशीत सूर्योदयाच्या पूर्वी रात्रीच्या शेवटच्या प्रहरी तैलाभ्यंग विशिष्ट फलदायक आहे.” आणि “ज्या वेळी चंद्रा- दयकाळी त्रयोदशीत अथवा दर्शात मंगललान होईल त्या वेळीं तें दुःख, शोक, भय यांतें देणारं आहे." असा काला. दशात त्रयोदशीचा निषेधही आहे. ह्या वरील वचनावरून असा अर्थ झाला की, जसा - अग्निहोत्रहोमाविषयीं यावजीव- पर्यंत असलेल्या सायंप्रातःकालामध्ये सायंप्रातःकालांनी व्यापलेल्या अशा उदितादि कालाला गुरुत्व (अष्टव) आहे. तसे येथे चतुर्दशी, चतुर्थ महर, अरुणोदय, चंद्रोदय हे पूर्वपूर्वीनीं उत्तरोतर व्यापलेले असल्यामुळे उत्तरोत्तराला गुरुल (श्रेष्ठल) आहे. आतां जें दिवोदासीयांत - "ज्या वेळी त्रयोदशी प्रातःकाली असून चतुर्दशीचा क्षय होतो आणि त्या दिवशी पहांटेस अमावास्या असते त्या वेळी अभ्यंगाविषयीं त्रयोदशी होते." असं वचन तें हेमाद्रि-निर्णयामृत इत्यादिकांनी लिहिलेलें नसल्यामुळें निर्मूल आहे. समूल मानिले तरी पूर्वदिवशींचा सूर्योदय व परदिवशींचा सूर्योदय या दोघांलाही चतुर्दशीचा संबंध नसणें अशा प्रकारचा तिथिक्षय एवं क्षयशब्दाने घ्यावयाचा नाहीं. कारण, तसा तिथिक्षय घेतला तर परदिवशीं सूर्योदयाच्या पूर्वी चतुर्दशी समाप्त असतां व चंद्रोदय असतां त्याच चतुर्दशीचा तूंच ( दिवोदासानंच ) स्वीकार केलेला आहे. तर अभ्यंगकालाच्या पूर्वी समाप्ति होणें हा क्षय एवं क्षयशब्दानं घ्यावयाचा आहे. तो हास (क्षय) अ णोदयाच्या किंवा चतुर्थप्रहराच्या पूर्वी जेव्हां असेल तद्विषयक है वचन आहे. म्हणजे जेव्हां परदिवशीं अरुणोदयाच्चा किंवा चतुर्थ प्रहराच्या पूर्वी चतुर्दशी समाप्त होईल तेव्हां त्रयोदशीचे दिवशीं पहांटेस चतुर्दशीमध्येच अभ्यंग करावा. पहाटेस सूर्योदयाच्या आंत चतुर्दशी नसेल तर परदिवशी रात्रीचे चतुर्थप्रहरीं असलीच पाहिजे, त्या वेळी अभ्यंग करावा. असे आहे म्हणूनच सर्वज्ञनारायणानें चवथ्या प्रहरी अभ्यंगस्नान सांगितलं आहे. तेंच सांगतो. - " आश्विन कृष्ण- चतुर्दशीचे ठायीं सूर्योदयाचे पूर्वी रात्रीच्या चतुर्थ प्रहरी तैलाभ्यंग करावा. " हे वचन वर लिहिले आहे. ज्योतिर्निबंधांत नारदही-“आश्विनकृष्ण चतुर्दशी, अमावास्या व स्वातियुक्त कार्तिकशुक्ल प्रतिपदा हे तीन दिवस दीपावलि होते. ह्या तीन दिवशी दीपोत्सव करावा." जे ग्रंथकार त्रयोदशीमध्यें स्नान करावें असें सांगतात त्यांचा आशय आम्हांला कळत नाहीं, असेंच म्हणतों. याहून ज्यास्त सांगत नाहीं. आतां जें "जो मनुष्य चतुर्दशीचे दिवशीं अरुणोदयावांचून इतरकाली स्नान करितो, त्याचा एक वर्षात उत्पन्न झालेला धर्म नष्ट होतो, यांत संशय नाहीं." असे दिवोदासीयांत भविष्यवचन तें स्नानाचा मुख्य काल जो अरुणोदय त्यावेळीं चतुर्दशी नसली तरी त्याचवेळी स्नान करावें, अशा अर्थाचं बोधक आहे. तात्पर्य-वरील सर्व वचनांवरून सूर्योदयाच्या पूर्वी पहाटेस चतुर्दशी नसतां त्रयोदशीत स्नान करावें, असा अर्थ होत नाहीं. याप्रमाणे सर्व अभीष्ट सिद्ध झाले आहे. अरुणोदय कोणता म्हणाल तर सूर्योदयाच्या पूर्वी चार घटिका जो काल तो अरु गोदय, असे तेथेच सांगितले आहे.
मदनरत्नांत पाद्मांत-"आघाडा किंवा भोपळ्याचे पान अथवा टाकळा हा नानकालीं नरकनाशार्थं अंगावरून फिरवावा.” फिरविण्याचा मंत्रः-“सीतालोष्टसमायुक्त सकंटक दलान्वित | हर पापमपामार्ग भ्राम्यमाणः पुनः पुनः" या चतुर्दशीचे दिवशींच प्रदोषकाली दीप लावावे असे सांगतों-हेमाद्रीत स्कांदांत "नंतर प्रदोषसमय ब्रह्मा, विष्णु, शिव, इत्यादिकांच्या मंदिरांत व मठांत दीप लावावे." दिवोदासीयांत ब्राह्मांत "कार्तिकमासामध्ये • अमावास्या व चतुर्दशी त्या दिवशी प्रदोषकाळी दिवे लावल्यानं मनुष्य यममार्गाच्या अधिकारांपासून मोकळा होतो." खंड- तिथि चतुर्दशी असेल तर पूर्वदिवशीं प्रदोषकालीं दिवे लावून परदिवशीं स्नान करावें, असें दिवोदासीयांत सांगितले आहे. या चतुर्दशीचे ठायीं नरकासुराचे उद्देशानें चार वातींनीं युक्त दीप लावावा. त्याविषयीं मंत्रः- "दत्तो दीपश्चतुर्दश्यां नरकप्रीतये मया ॥ चतुर्वर्तिसमायुक्तः सर्वपापापनुत्तये." दिवोदासीयांत लेंगांत "नरकचतुर्दशीचे दिवशीं उडदांच्या पानांच्या भाजीनें भोजन केलें असतां मनुष्य सबै पापांपासून मुक्त होतो.”
या चतुर्दशीचे ठायीं यमतर्पण सांगतो मदनपारिजातांत वृद्धमनु- "दीपोत्सव चतुर्दशीचे ठायीं यमतर्पण करानें:" मदनरत्नांत ब्राह्मांत- "आघाड्याची पानें मस्तकावर फिरवावीं. नंतर (नानानंतर ) यमाच्या नांवांनी तर्पण करावे” तें असें—“यमाय नमः यमतर्पयामि, धर्मराजाय नमः धर्मराजन०, मृत्यवेनमः मृत्युंत०, अंतकाय नमः अंतर्कत०, वैवस्वताय तमः वैवस्वतंत०, कालाय नमः कालंत, सर्वभूतक्षयाय नमः सर्वभूतक्षयंत०, औदुंबराय नमः औदुंबरंत०, दनाय नमः दनंत०, नीलाय नमः नीलंत०, परमेष्ठिने नमः परमेष्ठिनंत, वृकोदराय नमः वृकोदरंत०, चित्राय नमः चित्रत०, चित्रगुप्ताय नमः चित्रगु- तंत०, याप्रमाणें तर्पण करावें." तर्पणाचा प्रकार हेमाद्रींत सांगतो- “एकेक नाम घेऊन तिलांनी मिश्र अशा तीन तीन जलांजली द्याव्या, म्हणजे वर्षपर्यंत केलेलें पाप त्याच क्षणीं नाश पावतें.” तसेंच मदनरतांत स्कांदांत- “दक्षिणाभिमुख होऊन सव्य करून तिलसहिततर्पण करावे. यम हा देव असल्यामुळे देवतीर्थानें करावें. आणि तो प्रेताधिप असल्यामुळे तिलसहित करावें. " तसेंच "सव्यानें किंवा अपसव्याने करावें." हैं यमतर्पण जीवत्पितृकानेही करावें. कारण, “पिता जीवंत असतांही यम व भीष्म यांचे तर्पण करावें" असें पाद्मवचन आहे. या चतुर्दशीस भीष्मतर्पणही दिवो- दासीयांत सांगितले आहे. त्या भीष्मतर्पणाचा प्रकार माघमासप्रकरणी पुढे सांगूं. इति नरकचतुर्दशी.
नरक चतुर्दशी- धर्मसिंधु
आश्विन कृष्ण चतुर्दशीला नरकाची भीति बाळगणारांनीं तिळ तेल यांचा अभ्यंग करून स्नान करावें. या विषयीं रात्रीच्या शेवटच्या प्रहरापासून आरंभ करून अरुणोदयापर्यंत, तेथून चंद्रोद यापर्यंत व तेथून सूर्योदयापर्यंत याप्रमाणें तीन काल आहेत. हे पूर्वीच्याहून पुढचा श्रेष्ठ असे आहेत. याकरितां चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंतचा मुख्य काल होय. प्रातःकाल गौण जाणावा. पूर्व दिवशींच चंद्रोदयव्याप्ति असेल तर पूर्व दिवसाची चतुर्दशी घ्यावी. दुसऱ्या दिवशीच चंद्रो. दयव्याप्ति असेल तर दुसन्या दिवसाची घ्यावी. चंद्रोदयव्याप्तीचे पक्षी त्या दिवशी सूर्यास्त व गैरे कालीं युक्त असें उल्कादान ( कोलीत दाखविणें ), दीपदान वगैरे त्या त्या कालीं चतुर्दशी नसेल तथारि करावें. दोन दिवस चंद्रोदयव्याप्ति असेल तर पूर्व दिवसाची घ्यावी. दोन्ही दिवस चंद्रोदयव्याप्ति नसेल तर तीन पक्ष संभवतात -- (१) पूर्व दिवशीं चंद्रोदयानंतर उषःकाल व सूर्योदय यांना व्यापून आरंभ झालेली व दुसन्या दिवशी चंद्रोदयापूर्वी समाप्त झालेली चतुर्दशी.
उदाहरण -- त्रयोदशी घ० ५८ ५० ५० चतुर्दशी ५७. या पक्षीं उषःकालाच्या चतुर्दशीनें युक्त अशा एका भागांत स्नान कवि. ( २ ) पूर्व दिवशी फक्त सूर्योदयाला व्यापून आरंभ झालेली व दुस-या दिवशीं चंद्रोदयापूर्वी समाप्त झालेली चतुर्दशी; अथवा / ३) कोणत्याच दिवशी सूर्यो दयाला स्पर्श न केल्यामुळे क्षय असलेली चतुर्दशी. उदाहरण (२) त्रयोदशी ५९/५९ चतुर्दशी ५७; अथवा (३) त्रयोदशी २, त्या दिवशी चतुर्दशी ५४. या दोन्ही पक्षीं दुसन्या दिवश चंद्रोदयकाल अभ्यंग स्नान करावें, कारण चवथा प्रहर इत्यादि गौणकाली चतुर्दशीची व्याप्ति आहे. या दोन पक्षीं अरुणोदयाच्या पूर्वीही चतुर्दशीमध्येच स्नान करावे असे कोणी ग्रंथकार - णतात. अरुणोदयानंतर चंद्रोदय इत्यादि काली अमावास्येने युक्त असताही स्नान कराये असे दुसरे ग्रंथकार णतात. चतुर्दशीचा क्षय असतां पूर्व दिवशीं त्रयोदशीला स्नान करावे - णून कोणी सांगतात तें मात्र अयोग्य आहे. या अभ्यंगस्नानाविषयीं विशेष " सीतालाष्ठसमायुक्त सकंटकदलान्वित । हर पापमपामार्ग भ्राम्यमाणः पुनः पुनः ॥" या मंत्राने, नांगरानें उकरून का ढलेलें मातीचें ढेकूळ, व आघाडा, दुध्या भोपळ्याचा वेल टाकळा, यांच्या फांद्या ही स्नानामध्ये तीन वेळां आपल्या अंगावर फिरवावी. अभ्यंग स्नान केल्यावर गंधादि टिळक केल्यानंतर का- र्तिक स्नान करावें. उक्त कालांमध्यें स्नानाचा असंभव असेल तर सूर्योदयानंतर गौण कालामध्येही स्नान करावें. संन्यासी इत्यादिकांनी सुद्धां अभ्यंग स्नान अवश्य करावं. कार्तिक स्नानानंतर य मतर्पण करावें. तें असें -" यमाय नमः यमं तर्पयामि " असें ह्मणून तिळांनी मिश्र अशा तीन अंजली सव्यानें अथवा अपसव्याने ( जसा संभव असेल तसा ) देवतीर्थाने ( अंगुलीच्या अ- ग्रांनी ) अथवा पितृतीर्थाने ( अंगुष्ठ व तर्जनी यांच्या मधल्या भागानें ) दक्षिणेकडे तोंड करून द्याव्या पुढील तर्पणाविषयीही असेंच जाणावें. तें तर्पण असें" धर्मराजाय नमः धर्मराजं त- र्पयामि । मृत्यवे नमः मृत्युं० । अन्तकाय नमः अन्तकं तर्पयामि । वैवस्वताय नमः वैवस्वतं तर्प- यामि । कालाय नमः कालं तर्पयामि । सर्वभूतक्षयाय नमः सर्वभूतक्षयं तर्पयामि । औदुंबराय नमः औदुंबरं तर्पयामि । दध्नाय नमः दधूनं तर्पयामि । नीलाय नमः नीलं तर्पयामि । परमेष्ठिने नमः परमेष्ठिनं तर्पयामि । वृकोदराय नमः वृकोदरं तर्पयामि । चित्राय नमः चित्रं तर्पयामि । चित्रगु- ताय नमः चित्रगुप्तं तर्पयामि । " जीवत्पितृकानें हें तर्पण यवांनीं सव्याने करावें. नंतर प्रदोषस- मयीं मनोहर असे दीप देवालय, मठ, प्राकार, उद्यान, रस्ते, गोठा, अश्वशाळा, हस्तिशाळा यांचे ठिकाणी तीन दिवसपर्यंत लावावे. तुला राशीला सूर्य असतां चतुर्दशी व अमावास्या या दिवशीं प्रदोषकालीं पुरुषांनी हातामध्ये कोलीत अथवा चुडी घेऊन पितरांना मार्ग दाखवावा. त्याचा मंत्र " अग्निदग्वाश्च ये जीवा येप्यदग्धाः कुले मम । उज्ज्वलज्योतिषा दग्धास्ते यान्तु परमां गतिम् ।। यमलोकं परित्यज्य आगता ये महालये । उज्ज्वलज्ज्योतिषा वर्त्म प्रपश्यन्तु जन्तु ते ।। " या दिवशीं नक्तभोजन केले असतां महाफल आहे.
תגובות