Importance of dinner at real/assumed sister's place on bhaubeej/भाऊबीज/भाईदूज बहिणीच्या हातचे भोजन.
यमद्वितीया तर प्रतिपदायुक्त घ्यावी, असें निर्णयामृतादिकांत सांगितले आहे. यमद्वितीया मध्याहव्यापिनी व पूर्वविद्धा (प्रतिपदाविद्धा ) ध्यावी, असे हेमाद्रि सांगतो. या यमद्वितीयेचे ठायीं विशेष सांगतो - हेमाद्रींत स्कांदांत- "कार्तिक शुक्ल द्वितीयेचे ठायीं अपराह्नीं यमुनेमध्यें स्नान करून यमाचें पूजन करणारा यमलोक पहात नाहीं." "कार्तिकशुक्ल- द्वितीयेचे ठायीं पूजा करून तृप्त केलेला असा यम आनंदित किन्नरांनी वेष्टित होऊन पूजाकर्त्यास इच्छित फल देतो. " तसेंच भविष्यांत - "पहिली श्रावणांतील द्वितीया; दुसरी भाद्रपदांतील द्वितीया; तिसरी आश्विनांतील द्वितीया; आणि चवथी कार्तिकांतील द्वितीया आहे. श्रावणांतील द्वितीया कलुषा नांवाची होय. भाद्रपदांतील गीर्मला. आश्विनांतील प्रेतसंचारा. आणि कार्तिकांतील याम्यका होय.” असे सांगून पहिलीस व्रत, दुसरीस सरखतीपूजा, तिसरीस श्राद्ध सांगून चवथीस सांगतो-"पूर्वी कार्तिक शुक्ल द्वितीयेचे ठायीं यमुनेनें आपल्या घरीं यमाचें पूजन करून भोजन घातलें, म्हणून ही यमद्वि- तीया तीन लोकांमध्यें प्रसिद्ध झाली, या कारणास्तव या द्वितीयेचे ठायीं आपल्या घरीं पुरुषांनीं भोजन करूं नये. प्रीतीनें भगिनीच्या हातचें पुष्टिकारक भोजन करावें. आणि भगिनीला यथाशास्त्र दानेंही द्यावीं; सोन्याचे दागिने, बस्ने, अन्न, पूजा, सत्कार व भोजन यांहींकरून सर्व भगिनींचें पूजन करावें. भगिनी नसतील तर प्रतिपन्न (मानलेल्या) भगिनींचें पूजन करावें.→ पवित्रकाः भगिनीत्वेन कल्पिता इत्यर्थः ॥
" प्रतिपन्न म्हणजे मानलेल्या भगिनी, असें हेमाद्रि सांगतो. “पहिल्या (श्रावणांतल्या) द्वितीयेस चुलत बहीण कन्येच्या हातचें भोजन करावें. चवथ्या (कार्तिक) द्वितीयेस सोदरभगिनीच्या हातचं जेवावें. वर सांगितलेल्या चारही. बहिणीच्या हातचें जेवावें. दुसऱ्या द्वितीयेस मातुलकन्येच्या हातचें जेवावें. तिसऱ्या द्वितीयेस आत्याच्या व मावशीच्या कन्येच्या हातचे भोजन करावे. द्वितीयांचे ठायीं भगिनींच्या हातचं भोजन करावें, तें बलवर्धक आहे. प्रत्येक जगांत ज्या तिथीचे ठायीं यमुनेने भगिनीपणाच्या मैत्रीनें देव यमराजाला भोजन घातलें त्या तिथीचे ठायीं या लोकीं जो मनुष्य भगिनीच्या हातचें भोजन करितो त्याला रत्ने, सुख, धान्यें हीं उत्तम प्राप्त होतात." गौड तर- "यम, चित्रगुप्त, यमदूत यांचं पूजन करून सहजद्वय (भ्राता व बहीण ) यांनी या द्वितीयेचे ठायीं यमाला अर्ध्यही द्यावें.
" मंत्रः - "एह्येहि मातेडज पाशहस्त यमांत. कालोकधरामरेश ॥ भ्रातृद्वितीयाकृत देवपूजां गृहाण चार्ध्य भगवन्नमस्ते" | "भ्रातस्तवानुजाताहं भुंक्ष्व भक्तमिदं शुभं ॥ प्रीयते यमराजस्य यमुनाया विशेषतः " ॥
वडील भगिनीनें 'भ्रातस्तवाग्रजाताऽहं' असे म्हणावें असें स्मार्त सांगतात.
या मंत्रानें अन्नदान करावें असेंही (गौड) सांगतात. ब्रह्मांडपुराणांतही "जी असे द्वितीयेचे ठायीं भ्रात्याला भोजन देते व तांबूलादिकानें पूजन करिते तिला वैधव्य प्राप्त होत नाहीं,व तसें केल्यानं भ्रात्याच्या आयुष्याचा क्षय कधींही होत नाहीं. "
Comments