See this post by Pandit for Puja Pune on Google: https://posts.gle/7JTp4
होळी (हुताशनी) पौर्णिमा :- या दिवशी अभ्यंगस्नान करावे. सा
आंब्याच्या कोवळ्या फुलांचा रस प्राशन करावा. सायंकाळी होळी पेटवून पूजा करावी. होली केस प्रदक्षिणा घालून संख्येत ध्वनि करावा. त्यामध्ये नारळ भाजून प्रसाद घ्यावा.घरात त्रास देणाऱ्या जीव कीटकांच्या कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकण्याची चाल अनेक ठिकाणी आहे हे त्यामुळे ते जिवाणू नष्ट होतात.
धुलीवंदन
होळीचे दुसरे दिवशी सकाळी होलिकेचे भस्म कपाळा लावावे. त्यावेळेस खालील श्लोक म्हणावा.
वंदितासि सुरेंद्रेण ब्रह्मणा शंकरेणच अतस्त्वाम पाहिनो देवि भूते
भूतिप्रदा भव ।।
हे होलिकादेवी तुला ब्रह्मा विष्णु शंकर यांनी वंदन केले आहे.
म्हणून तू आमचे रक्षण कर. आणि सर्व भूत प्राणीमात्रांचे कल्याण कर व ऐश्वर्य दे.
वसंतोत्सव:- या दिवशी नृत्य,नाटक, गायन, वादन आदि कार्यक्रमांनी वसंतोत्सव साजरा करावा. होळी पौर्णिमा व धुलिवंदनाचा दिवस हे लागोपाठ दोन दिवस करिदिन असल्याने कोणत्याही शुभकार्यासाठी योग्य नाहीत.
Comments