Gudhi Padawa गुढीपाडवा 30 March 2025.
- Vedmata Gayatri J & D Kendra
- Sep 14, 2023
- 2 min read
Updated: Mar 29

श्री गणेशाय नमः।। श्री सरस्वत्यै नमः।। ।।अथ संवत्सर फलम्।।
स जयति सिन्धूर्वदनो देवो यत्पाद पङ्कज स्मरणम् ।
वासरमणिरिव तमसां राशीन् नाशयति विघ्नानाम्।।१।।
प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे ते मिरज समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदुरवदन देव उत्कर्ष पावत आहे.
नत्वा गणपतिं खेटान् ब्रह्मविष्णुशिवत्मकान्।
संवत्सरफलम् वक्ष्ये सर्व कामार्थसिद्धये।।२।।
सर्व कार्याची सिद्धी होण्याकरिता श्री गणपती ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो.नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत. मंगलस्नान अभ्यंग करून ब्राह्मणांसह देवांची व गुरुची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषण करून उत्साह करावा. ज्योतिषाचा सत्कार करून त्यांच्याकडून वर्ष फल श्रवण करावे. म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल.प्रथम मंगलस्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे. म्हणजे व्याधीचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य व लक्ष्मी संपत्ती ही प्राप्त होतात. मिरे,हिंग,मीठ, ओवा, व साखर यांच्यासह पुष्पा सहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून,रोग शांती होण्याकरता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दान अधिकाऱ्यांनी संतोष होऊन मिष्ठान्न भोजन घालावे. नाना प्रकारचे गीते वादे व पुण्य पुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा. म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. परधान यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते.
गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो. याच सणापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. या सणाच्या निमित्ताने घरोघरी उंचच उंच गुढी उभारून नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. याच दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. या वर्षी गुढीपाडव्याचा सण ३० मार्च २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक मराठी घरामध्ये गुढी उभारून स्वादिष्ट अन्नपदार्थ, गोडधोड बनवून कुटुंबासह या सणाचा आनंद घेतला जातो. दाराबाहेर सुंदर फुलांचे तोरण, रांगोळी काढली जाते. त्यामुळे सर्वत्र चैतन्यमय, उत्साही वातावरण पाहायला मिळते. यंदा या सणानिमित्त तुम्ही नातेवाईक, प्रियजन आणि मित्र परिवाला शुभेच्छा पाठवून त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत करू शकता.

Comments