GHATSTHAPANA NAVRATRA POOJA
घटस्थापना नवरात्र पूजा
आश्विन शुक्ल प्रतिपदेला देवीच्या नवरात्राचा आरंभ होतो. नवरात्र शब्दाने आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून आरंभ करून महानवमीपर्यंत करावयाचे कर्म जाणावें. या कर्मामध्ये पूजा प्रधान आहे. उपवासादिक व स्तोत्रं, जप इत्यादि अंगें होत. उपवास, एकभक्त, नक्त, अयाचित यांपैकी जसा कुलाचार असेल त्याप्रमाणे एखादे व्रत आणि सप्तशती, लक्ष्मीहृदयादि स्तोतें व जप जसा कुलाचार असेल त्याप्रमाणे कर्म यांनी युक्त प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ तिथींचे दिवशी पूजाख्य जे कर्म तो नवरात्र शब्दाचा अर्थ जाणावा.पूजेचे प्राधान्य सांगितले आहे याकरितां क्वचित कुलामध्ये जप, उपवास इत्यादिकांचा अभाव आढळतो. नवरात्रकर्मामध्ये पूजेचा अभाव मात्र कोणत्याही कुळामध्ये आढळत नाही. ज्या कुळामध्ये मुळी नवरात्रच करीत नाहींत त्यांमध्यें पूजेचा देखील अभाव असल्यास नवल नाहीं. त्यांची गोष्टच वेगळी.
नवरात्र कर्माचे ठिकाणी ब्राह्मणादि चार वर्ण व म्लेच्छ इत्यादि यांना अधिकार आहे. ब्राह्मणानें जप, होम, अन्नाचा बली, नैवेद्य यांनी सात्विक पूजा करावी. क्षत्रिय व वैश्य यांना मांसादिकांनी युक्त व जप, होम यांनी सहित अशा राजसपूजेचाही अधिकार आहे. हा अधिकार केवल काम्य आहे, नित्य नाहीं. निष्काम अशा क्षत्रियाने सात्विक पूजा केली तर मोक्ष इत्यादि फलातिशय प्राप्त होतो. याप्रमाणे शूद्रांदिकांनाही सात्विक पूजेने फलातिशय प्राप्त होतो. शूद्रांदिकांना मंत्रविरहित, जपविरहित व मासांदि द्रव्याने युक्त अशी तामसपूजा विहित आहे. शूद्रांने समशती, जप, होम यांनी युक्त अशी सात्विक पूजा ब्राह्मणाकडून करावी.स्त्री शूद्र यांना स्वतः पुराणमंत्राचा पाठ करण्या- विषयी अधिकार नाही. म्हणून 'शूद्र सुख पावेल' इत्यादि वाक्यांवरील भाष्यामध्ये स्त्री, शूद्र यांना श्रवणानेच फळ मिळते, पाठाने नाही असे सांगितले आहे. यावरून स्त्रिया व शुद्र यांनी गीता, विष्णुसहस्रनाम यांचा पाठ केल्यास दोष आहे असें समजावें. परंतु पुराणमंत्रानी युक्त अशी पूजा स्वतः करण्याला स्त्रिया व शुद्र यांनाही अधिकार आहे असे कांही मध्ये लिहिले आहे. अर्थात् या ग्रंथकारांच्या आधाराने गीता इत्यादिकांचा पाठ करण्यास हरकत नाही असे सिद्ध होतें. जप, होम वगैरे ब्राह्मणाकडून करावें. म्लेच्छ इत्यादिकांना जप, होम व समंत्रक पूजा ही ब्राह्मणाकडून देखील करविण्याला अधिकार नाहीं. पण त्यांनी ते उपचार देवीच्या उद्देशाने मनाने समर्पण करावे.
नवरात्राचे गौणपक्ष-
तृतीयेपासून नवमीपर्यंत सात दिवस नवरात्र करावें. पंचमीपासून नवमीपर्यंत पांच दिवस नवरात्र करावे. सप्तमीपासून नवमीपर्यंत तीन दिवस नवरात्र करावे. अष्टमीपासून नवमीपर्यंत दोन दिवस नवरात्र करावे. एकच दिवस करावयाचे असेल तर केवल अष्टमी अथवा केवल नवमी या दिवशी करावें. आपापल्या कुलाचाराप्रमाणे अथवा प्रतिबंधामुळे पहिल्या पहिल्या पक्षाचा असं- भव असेल त्याप्रमाणे या पक्षांची व्यवस्था जाणावी. यामध्ये तृतीया व पंचमी यांचा निर्णय सप्तमीप्रमाणे जाणावा. सप्तमीचा निर्णय पुढं सांगेन. वर सांगितलेल्या पक्षांचे ठिकाणी तिथीचा क्षय अथवा वृद्धि यांमुळे दिवसांचे आधिक्य अथवा न्यूनत्व झालें असतां पूजा इत्यादिकांची आवृत्ति करावी. (ह्मणजे तिथींची वृद्धि असेल तर दोन्ही दिवशी एकेकदा पूजा करावी व क्षय असेल तर एका दिवशी दोन वेळां पूजा करावी. ) दिनक्षय असेल तर कोणी पूजा व पाठ आठ आठ करतात. हे देवीपूजनात्मक नवरात्र नित्य आहे व काम्यही आहे. कारण न केले. असतां दोष सांगितला आहे व केलें असतां फल सांगितले आहे.
या नवरात्रामध्ये घट स्थापन करणे; प्रातःकाली, मध्याह्नकाल व प्रदोषकाली याप्रमाणे तीन वेळ, दोन वेळ अथवा एक वेळ आपापल्या कुलदेवतेचे पूजन करणे; सप्तशती इत्यादिकांचा जप; अखंड दीप; आपल्या आचारानुसार माळा बांधणे; उपवास, नक्त, एकभक्त इत्यादि नियमः सुवासिनीभोजन; कुमारीभोजन, पूजन इत्यादि; शेवटच्या दिवशीं सप्तशती इत्यादि स्तोत्रमंत्राचा जप व होम याप्रमाणे कृत्ये करावी असे सांगितले आहे. यापैकी काही कुलांमध्ये घटस्थापना इत्यादि दोन तीन कर्मेच करतात, सर्व करीत नाहींत. कांहीं कुलांमध्यें घटस्थापनेवांचून इतर कांहीं करतात. कांहीं कुलांमध्ये सर्व करतात. या कर्मांचा समुच्चय ( सर्व कर्मे करणे ) अथवा विकल्प ( कांहीं कर्मे करणें ) यांची व्यवस्था आपापल्या कर्मांचा कुलाचाराप्रमाणे जाणावी. शक्ति असेल तथापि आपल्या कुलपरंपरेनें प्राप्त झालेल्या कर्माहून अधिक करू नयेत असा शिष्टाचार आहे. फलाची कामना धरून करावयाचा उपवास वगैरे कुलाचार नसला तथापि करावा. हे घटस्थापन रात्री करू नये. कलशस्थापनेकरितां शुद्ध मृत्तिकेनें वेदी करून पंच पल्लव, दूर्वा, फल, तांबूल, कुमकुम धूप इत्यादी सामुग्री जमवावी.
अथसंक्षेपतोनवरात्रारम्भप्रयोगः प्रतिपदिमातः कृताभ्यङ्गमानः कुंकुमचन्द- नादिकृतपुण्ड्रोघृतपवित्रः सपत्नीकोदशघटिकामध्येऽभिजिन्मुहुर्ते वा देशका- संकीर्त्य
संकल्प:
ममसकुटुम्बस्यामुक देवतामीतिद्वारा सर्वापच्छान्तिपूर्वकदीर्घायुर्धन पुत्रादिवृद्धिशत्रु जय कीर्तिलाभप्रमुख चतुर्विधपुरुषार्थसिद्ध्यर्थमद्यप्रभृतिमहान- वमीपर्यन्तं प्रत्यत्रिकालमेककालं वामुकदेवतापूजामुपवासनक्तैकभक्तान्यत मनियमसहितामखण्डदीपप्रज्वालनं कुमारी पूजनं चण्डी सप्तशतीपाठं सुवासिन्या- दिभोजनमित्यादियावत्कुलाचारप्राप्तमनूद्यएवमादिरूपं शारद नवरात्रोत्सवा- ख्यंकर्मकरिष्ये देवतापूजाङ्गत्वेन घटस्थापनंचकरिष्ये तदादौनिर्विघ्रतासिद्ध्य- गणपतिपूजनं पुण्याहवाचनं चण्डी सप्तशती जपायर्थत्राह्मणवरणंचकरिष्ये.
याप्रमाणे संकल्प करावा. गणपतिपूजन, पुण्याहवाचन आणि चंडी व सप्तशती यांच्या पाठाकरितां ब्राह्मणवरण ही केल्यानंतर घटस्थापना करावयाची असेल तर "मही द्यौ० " या मंत्राने भूमीला स्पर्श करून त्या भूमीमध्ये अंकुर रुजण्याकरितां शुद्ध मृत्तिका घालावी. " ओषधयः सं० " या मंत्रानें त्या मृत्तिकेमध्यें यव वगैरे टाकावे. " आकलशेषु० " या मंत्राने ठेवून तो " इमं मे गङ्गे० " या मंत्राने उदकाने भरावा. गंधद्वारां " या मंत्राने गंध घालावे. " या ओषधी० " या मंत्राने "सर्व ओषधी (कुष्ट, मांसी, हळद, आंबेहळद, वेखंड, चंपक, चंदन, दगडफूल, नागरमोथा, मुरा) कलशांत ठेवाव्या. "कांडाकांडात" या मंत्राने दुर्वा कलशांत ठेवाव्या. “अश्वत्थेव० "या मंत्राने पंच पल्लव कलशांत ठेवावे. "स्यो
ना पृथिवी" या मंत्राने सप्त मृत्तिका (हत्ति, अश्व, राजद्वार, वारुळ, चबाठा, हृद, गोष्ठ या ठिकाणच्या मृत्तिका ) कलशांत घालाव्या. याः फलिनी: ० " या मंत्राने फल कलशांत ठेवावे. “सहि रत्नानिः" या मंत्राने रत्नं (सुवर्ण, हिरा, पोबळें, मौक्तिक, नील) व " हिरण्यरूप ० " या मंत्राने सुवर्ण ही फलशांत ठेवावी. नंतर कलशाला सूत्राचे वेष्टन करून "पूर्णा द० " या मंत्रानें त्यावर पूर्ण पाल ठेवून “तत्वा यामि० " या मंत्रानें वरुणाची पूजा करावी. नंतर त्या कलशावर आपल्या कुलदेवतेची प्रतिमा ठेवून पूजा करावी. अथवा कुलदेवतेच्या प्रतिमेची स्वस्थानीच स्थापना करून पूजा करावी. ती अशी " जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी । दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तु ते. युवासुवासा० या मंत्रा या ते || आगच्छ वरदे देवि दैत्यदर्पनिषूदिनि । पूजां गृहाण सुमुखि नमस्ते शंकरभिये ||काली० " या मंत्राने व सूकाच्या ऋचांनी षोडशोपचार पूजा करावी. " सर्व मंङ्गलमाङ्गल्ये ० " मंत्री व पुरुषसूक्त आणि श्रीसूक्त यांच्या प्रथम ऋचानी आवाहन करून "जयन्ती मङ्गला इत्यादि मंत्रांनी प्रार्थना करावी. दररोज बलिदान करण्याचा पक्ष असेल तर माषमिश्रित भाताचा अथवा कूष्मांडाचा बळी द्यावा. अथवा फक्त शेवटचे दिवशींच बलिदान द्यावे अगर मुळींच देऊ नये. त्यानंतर " अखंडदीपकं देव्याः प्रीतये नवरात्रकम् । उज्ज्वालये अहोरात्रमेकचित्तो घृतत्रतः ॥ या मंत्राने अखंडदीपाची स्थापना करावी.
चंडीपाठाचा प्रकार.
ब्राह्मणानें “यजमानेन वृतोऽहं चण्डीसप्तशतीपाठं नारायणहृदयलक्ष्मीहृदयपाठं वा करिष्ये" असा संकल्प करून आसनादिक विधि करावा. दुसऱ्याने लिहिलेले पुस्तक पीठावर स्थापन करून नारायणाला “नमस्कार करून आरंभ करावा" असे वचन आहे याकरिता “ॐ नारायणाय नमः नराय नरोत्तमाय नमः देव्बे सरस्वत्यै नमः व्यासाय नमः " याप्रमाणे नमस्कार करून ॐकाराचा उच्चार करावा व सर्व पाठ झाल्यानंतरही अंकाराचा उच्चार करावा. पुस्तक वाचण्याचे नियम- हातामध्यें पुस्तक धरूं नये. स्वतः लिहिलेले अथवा ब्राह्मणेतरांनं लिहिलेले पुस्तक निष्फल होय. अध्याय समाप्त झाल्यावर थांबायें. मध्ये थांबूं नये मध्ये थांबल्यास पुन्हां आरंभापासून तो अध्याय वाचावा. " ग्रंथाचा अर्थ जाणून, अक्षरांचा स्पष्ट उच्चार करीत फार जलद नाहीं व फार मंद नाही अशा रीतीने रस, भाव, स्वर यांनी युक्त असे वाचन करावे. धर्म, अर्थ व काम याची इच्छा करणाराने चण्डीपाठ सर्वदा करावा करावे व सदा भक्त श्रवण करावे" इत्यादि वचन आहे. म्हणून नैमित्तिक पाठ देखील सांगितला माहात्म्य श्रवण करावं. म्हणून माझे हे माहात्म्य स्थिरचित होऊन पठन आहे." सर्व शांतिकर्मीचे ठिकाणी, दुःस्वप्न पाहिले असतां व उग्र ग्रहांची पीडा असतां माझे तसेच अरण्यामध्ये शून्यस्थानी दावाग्नीने वेष्टित वस्तूंनी वेढा दिलेला अथवा शत्रूनी शून्य स्थानी धरलेला " इत्यादि संकटे असता, तसेच "सर्व प्रकारच्या उग्र बाधा अगर वेदना यांनी त्रस्त झाला असतां मनुष्याने माझे हे माहात्म्यस्मरण करावें ह्मणजे संकटापासून मुक्त होतो. " असे वचन आहे. उपद्रवाच्या नाशाकरितां तीन पाठ करावे. महांच्या पीडच्या शांतीकरितां पांच शांती व बाजपेययज्ञाची फलप्राप्ति होण्याकरितां नऊ, राजा वश होण्याकरितां अकरा, शत्रूचा नाश होण्याकरितां बारा, स्त्री पुरुष वश होण्याकरितां चौदा, सौख्य व लक्ष्मी यांच्या प्रीत्यर्थ पंधरा, पुत्रपौत्र धन धान्य याकरितां सोळा, राजभयाच्या नाशाकरितां सतरा उच्चाटनाकरितां अठरा, वनभयाचे नाशाकरिता वीस, बंधमुक्त होण्याकरितां पंचवीस, दुर्धर रोग, कुलाचा उच्छेद आयुर्नाश, शत्रूची वृद्धि, रोगाची वृद्धि, आध्यात्मिक आधिभौतिक व आधिदैविक उत्पात इत्यादि महासंकटांचा नाश आणि गुज्यवृद्धि होण्याकरितां शंभर, याप्रमाणे पाठ करावे. सहस्त्र पाठ केले असतां शंभर अश्वमेघ यज्ञांचे फल, सर्व मनोग्धाची सिद्धि आणि मोक्ष हीं प्राप्त होतात असे वाराहीतंत्रामध्ये सांगितलें आहे. सर्वत्र काम्यपाठ करितांना प्रथम संकल्पपूर्वक पूजन करून अंती बलिदान करावें. या नवरात्रामध्ये आचार असेल तर वेदांचे पारायण देखील करावे.
कुमारीपूजेचा विधि- एक वर्षाची कन्या पूजेला वर्ज्य करावी. दोन वर्षांच्या कन्येपासून दहा वर्षांचे कन्येपर्यंत कुमारीची पूजा करावी. दोन वर्षाची कुमारी ती कुमारिका, तीन वर्षाची त्रिमूर्ति, चार वर्षाची कल्याणी, पांच वर्षाची रोहिणी, सहा वर्षाची काली, सात वर्षाची चंडिका, आठ वर्षाची शांभवी, नऊ वर्षाची दुर्गा आणि दहा वर्षांची मद्रा यापमाणे नऊ कुमारीची नांयें जाणावी. या कुमारीच्या प्रत्येकाच्या पूजेने मंत्र, फलविशेष, लक्षणं इत्यादि अन्य ग्रंथी पहावी. ब्राह्मणानें ब्राह्मणी कुमारीची पूजा करावी. यापमाणे सवर्णा कुमारी प्रशस्त होय. कामना विशेषाप्रमाणे विजातीय कुमारीचीही पूजा क रावी असें कचित् सांगितले आहे. दररोज एकेक अधिक अथवा रोज एक याप्रमाणे कुमारीची पूजा करावी. “ मन्त्राक्षरमयी लक्ष्मी मातृणां रूपधारिणीम् । नव दुर्गात्मिकां साक्षात्कन्यामावाहया- म्यहम् || जगत्पूज्ये जगद्वन्ये सर्वशक्तिस्वरूपिणि । पूजां गृहाण कौमारि जगन्मातर्नमोस्तु ते ॥ " या मंत्राने पादप्रक्षालनपूर्वक वस्त्र, कुंकुम, गंध, धूप, दीप, भोजन यांनी पूजा करावी असा संक्षेप जाणावा. कुमारीपूजेप्रमाणे देवीपूजा व चंडीपाठही दररोज एक अधिक याप्रमाणे करावी. भवानीसहस्रनामाचाही पाठ करावा असें क्वचित ग्रंथी सांगितले आहे. हा शरदऋतू तील नवरात्रोत्सव मलमासामध्ये निषिद्ध आहे.शुक्रास्त इत्यादि असतां होतो; प्रथम आरंभ मात्र शुक्रास्तादिकांत करू नये. मृताशौच व जननाशौच असतां घटस्थापनेपासून सर्व विधि ब्राह्मणाचे द्वारे करावा. आरंभ केल्यानंतर मध्यंतरी आशौच आल्यास स्वतःच पूजादिक अखेरपर्यंत करावे असे कोणी ग्रंथकार म्हणतात. परंतु आशौच असतांना पूजा, देवतेचा स्पर्श इत्यादि केला असता लोकनिंदेला पात्र होतो याकरितां दुसर्याकडूनच करवितात. तृतीया, पंचमी, सप्तमी इत्यादि तिथींना नवरात्राचा आरंभ करावा असे जे गौण पक्ष सांगितले आहेत त्यांचा आश्रय करून प्रतिपदेला आशौच असेल तर तृतीयेपासून आरंभ, तृतीयेचे दिवशी असेल तर पंचमीपासून आरंभ याप्रमाणे संभव असेल तसा गौण पक्ष स्वीकारून दुसरे कोणी नवरात्र करतात व सर्वथा लोप होत असेल तरच ब्राह्मणाकडून करवितात. उपवास इत्यादि शरीरसंबंधी नियम स्वतः पाळावे. याप्रमाणे रज-स्वलेने देखील उपवासादि स्वतः करून पूजादिक दुसर्याकडून करवावे. नवरात्रामध्ये सौभाग्यवती स्त्रियांना उपवासाचे दिवशी गंध, तांबूल इत्यादिकांविषयीं दोष नाही असे सांगतात.
תגובות