top of page
Search

जाणून घ्या. या वर्षी शास्त्रोक्त श्रीलक्ष्मी पूजन 31 ऑक्टोबर ला की 1 नोव्हेंबर ला ? Know Shree Lakshmi Pujan, Is it on 31st October or 1st November this year ?

Updated: Oct 22, 2024

आश्विन अमावास्येचे दिवशीं प्रातःकाली अभ्यंगस्नान, प्रदोष काली दीपदान, लक्ष्मीपूजन इत्यादि सांगितली आहेत. सूर्योदयाला व्यापून पून्हा सूर्यास्तानंतर एक घटिकेपेक्षां अधिक रात्रीची व्याप्ति असेल तर संदेह नाहीं. या दिवशीं प्रातःकाली अभ्यंगस्नान, देवपूजा वगैरे करून  अपरान्ह काली पार्वण श्राद्ध करावें. प्रदोषसमयीं दीपदान, उल्काप्रदर्शन व लक्ष्मीपूजन हीं करून नंतर भोजन करावें. या अमावास्येचे दिवशीं बाल, वृद्ध इत्यादिकावांचून इतरांनी दिवसास भोजन करूं नये. रात्री भोजन करावें असें विशेष वचन आहे. केवल दुसऱ्या दिवशीं अथवा दोन दिवस प्रदोषव्याप्ति असेल तर दुसऱ्या दिवसाचीच घ्यावी. पूर्वदिवशींच प्रदोषव्याप्ति असेल तर लक्ष्मीपूजनादिकाला पूर्व दिवसाचीच व अभ्यंगस्नान इत्यादिकाविषयीं दुसऱ्या दिवसाचीच घ्यावी. दोन्ही दिवस प्रदोषव्याप्त नसेल तरी असाच निर्णय जाणावा. पुरुषार्थचिंतामणीमध्यें, पूर्व दिवशींच प्रदोषव्याप्ति असेल व दुसर्‍या दिवशीं तीन प्रहराहून अधिक अमावास्येची व्याप्ति असेल तर अमावास्यपेक्षां प्रतिपदा अधिक असल्यास लक्ष्मीपूजनादिक दुसऱ्या दिवशींच करावें, असें सागितलें आहे. या मतानें, दोन्ही दिवस प्रदोषकालीं व्याप्ति नसली तरी दुसऱ्या दिवशीं साडेतीन प्रहरांहून अधिक अमावास्येची व्याप्ति असते ह्मणून दुसऱ्या दिवसाचीच घ्यावी हैं युक्त आहे असें वाटतें. चतुर्दशी पासून तीन दिवसांना दीपावली अशी संज्ञा आहे. यापैकीं ज्या दिवशीं स्वातीनक्षत्राचा योग असेल तो दिवस जास्त प्रशस्त होय.

या अमावास्येचेच दिवशीं मध्यरात्री- नंतर नगरांतील स्त्रियांनी आपल्या गृहाच्या अंगणांतून अलक्ष्मीला बाहेर घालवावी. पूर्व दिवशींची घेतली असतां पर दिवशीं अपराह्नव्यापिनींत श्राद्ध असल्यामुळे या कमाचा वाघ आला, असें म्हणू नये. कारण, संपूर्ण तिथीचे ठायींच त्या क्रमानी प्राप्ति असल्यामुळे त्याचा अनुवाद केला आहे. त्या क्रमाचा अपूर्वविधि नाहीं. कारण, ह्या क्रमविधायक वाक्यापेक्षां त्या त्या कर्मकालव्याप्तिशास्त्राला बलिष्ठ्ठ आहे. आणि जर हे वाक्य क्रमाचें विधायक म्हटलें तर संपूर्ण तिथि असतां क्रमप्राप्त असल्यामुळे त्याविषयीं अनुवादक महटले पाहिजे, व खंड तिथीचे ठायीं अप्राप्त असल्यामुळे त्याविषयीं विधायक म्हटले असतां जे विधिवाक्य तेच अनुवादक झाल्यानं विधीचा व अनुवादाचा एकत्र विरोधही येतो, असें सांगितलं आहे. त्याच अमावास्येस अपररात्री अलक्ष्मीचं निःसारण सांगतो मदनर भविष्यांत " याप्रमाणे मध्यरात्र गेली असतां निद्रेनें लोकांचे अर्धे डोळे मिटले असतां त्या वेळी नगरांतील स्त्रियांनी सूप व डिंडिम ( दंवडी ) वाजवून मोठ्या आनंदानं आपआपल्या गृहांगणांतून अलक्ष्मी बाहेर घालवावी.

दाते पंचांगानुसार - लक्ष्मीपूजन (दीपावली) 1 नोवेंबर 2024, शुक्रवारी


यावर्षी शक १९४६ मध्ये 31 अक्टोबर 2024 रोजी चतुर्दशी समाप्ति १५:५३ असून त्यानंतर अमावास्या सुरु होत आहे आणि दुसरे दिवशी । नोवेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी १८:१७ वाजता अमावास्या समाप्ति आहे.


31 अक्टोबर रोजी प्रदोषकाळात अमावास्येची अधिकव्याप्ति असून दुसरे दिवशी । नोवेंबर रोजी शुक्रवारी अमावास्या प्रदोषकाळात अल्पकाळ असताना । नोवेंबर रोजी लक्ष्मीपूजन दिले आहे. धर्मसिंधु, पुरुषार्थ चिंतामणि, तिथिनिर्णय, व्रतपर्व विवेक इ. ग्रंथांमधील वचनांचा विचार करून दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावास्येची कमी-अधिक व्याप्ती असता दुसरे दिवशी म्हणजे अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे आहे.


• परदिने एव दिनद्वयेपि वा प्रदोषव्याप्तो परा। पूर्वत्रैव प्रदोषव्याप्तौ लक्ष्मीपूजनादौ पूर्वा । (धर्मसिंधु) इयं प्रदोषव्यापिनी ग्राह्या, दिनद्वये सत्त्वाऽसत्त्वे परा। (तिथिनिर्णय)


यदा सायाह्नमारभ्य प्रवृत्तोत्तरदिने किंचिन्न्यूनयामत्रयम् अमावास्या तदुत्तरदिने यामत्रयमिता प्रतिपत्तदाऽमावास्याप्रयुक्त दीपदानलक्ष्मीपूजादिकं पूर्वत्र । यदा तु द्वितीयदिने यामत्रयममावास्या तदुत्तरदिने सार्धयामत्रयं प्रतिपत्तदा परा । (पुरुषार्थ चिंतामणि) अर्थात् अमावास्या तीन प्रहरानंतर संपत असेल आणि प्रतिपदा साडेतीन प्रहरानंतर संपत असेल तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनादि करावे.


प्रदोषकाळात अमावास्येची कमी व्याप्ती असताना त्या दिवशी सायाह्नकाळी व प्रदोषकाळी अमावास्या मिळत आहे. तसेच अमावास्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असल्याने प्रतिपदायुक्त अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे आहे. युग्मास महत्त्व द्यावे असे वचन असल्याने, या सर्व वचनांची संगती लावून आम्ही 1 नोवेंबर 2024 रोजी शुक्रवारी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. या दिवशी सूर्यास्तानंतर अमावास्या प्रदोष काळात अल्पकाळ असली तरी सायाह्न काळापासून प्रदोषकाळ समाप्ती पर्यंत (म्हणजे सूर्यास्तानंतर सुमारे २ तास २४ मिनिटे या कालावधीत) नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजन करता येईल.


यापूर्वी 28-10-1962, 17-10-1963 आणि 2-11-2013 रोजी यावर्षी प्रमाणेच अमावास्या प्रदोषात अल्पकाळ असताना अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन दिलेले होते. वरील उल्लेखित ग्रंथांमधील वचनांचा आणि जुन्या पंचांगातील निर्णयांचा विचार करुन 1 नोवेंबर 2024 ला शुक्रवारी दिलेले लक्ष्मीपूजन शास्त्रसंमत आहे.


1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन देणारी महाराष्ट्रातील काही प्रमुख पंचांगे


महाराष्ट्रातील - कालनिर्णय पंचांग (मुंबई), महालक्ष्मी पंचांग (कोल्हापूर), महाराष्ट्रीय पंचांग (नागपूर), स्वामी समर्थ पंचांग (डोंबिवली), निर्णयसागर पंचांग (ठाणे), सोमण पंचांग (ठाणे) श्रीस्वामी गादी पंचांग (मुंबई)


रुईकर पंचांगानुसार :

श्रीलक्ष्मीपूजन

गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४

या वर्षी आश्विन कृष्ण चतुर्दशी गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी चतुर्दशी दुपारी ३ वाजून ५४ मिनिटांनी संपत आहे व त्यानंतर अमावास्या आरंभ होत आहे. आश्विन कृष्ण अमावास्या शुक्रवार दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी अमावास्या ६ वाजून १७ मिनिटांनी संपून नंतर प्रतिपदा आरंभ होत आहे.


धर्मसिंधू, निर्णयसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, कृत्त्यसंग्रह इत्यादि ग्रंथानुसार - १) अमावास्या सूर्योदयाला आरंभ होऊन सूर्यास्तानंतर १ घटीका (२४ मिनिटे) पेक्षा जास्त प्रदोषव्यापिनी अथवा त्याहून जास्त रात्रव्यापिनी असेल तर त्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे. २) जर दोन्ही दिवशी प्रदोषकाळ व्याप्ती नसेल तर दुसऱ्या दिवशी घ्यावे. ३) पुरुषार्थ चिंतामणी मते पूर्व दिवशीच प्रदोषव्याप्ती असेल व दुसऱ्या दिवशी ३ प्रहराहून अधिक अमावास्या असेल तर श्रीलक्ष्मीपूजन दुसरे दिवशी करावे. याचे खंडन धर्मसिंधूकारांनी केले आहे की दोन दिवस प्रदोषव्याप्ती नसेल तर दुसरे दिवशी लक्ष्मीपूजन करावे.


दुसरे दिवशी भारताच्या पश्चिम टोकाकडील शहरामध्ये दिनांक १ नोव्हेंबर २४ रोजी सूर्यास्त ६।१७ ला होत आहे व पूर्वटोकाकडील शहरामध्ये सूर्यास्त दुपारी ४।३३ ला होत आहे. म्हणजे पश्चिमेकडे १ नोव्हेंबरला प्रदोषकाळ (म्हणजे सूर्यास्तानंतर २ तास २४ मिनिटे) १ घटके (१ घटका = २४ मिनिटे) पेक्षा कमी येत आहे व पूर्वेकडे प्रदोषकाळ १ घटकेपेक्षा जास्त मिळत आहे. म्हणजे जेथे सूर्यास्त सायंकाळी ५/५३ पूर्वी होत असेल (नागपूर, नांदेड, चंद्रपूर, यवतमाळ आंध्रप्रदेश व पूर्वेकडील राज्ये) तेथे १ नोव्हेंबर व जेथे सूर्यास्त सायंकाळी ५।५३ नंतर होत असेल (कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे, पैठण, पंढरपूर, सोलापूर, गोवा, केरळ, गुजराथ, राजस्थान) तेथे ३१ ऑक्टोबरला श्रीलक्ष्मीपूजन येत आहे. याचा अर्थ असा की श्रीलक्ष्मीपूजन दोन दिवसांत विभाजन करावे लागेल. संपूर्ण भारतामध्ये दिनांक ३१ ऑक्टोबरला पूर्ण प्रदोषकाळ मिळत आहे. या दिवशी एकवाक्यता होत आहे.


दिनांक ३१ ऑक्टोबर ला कराडचा सूर्यास्त सायंकाळी ५/५८ ला आहे म्हणजे सूर्यास्तानंतर संपूर्ण ६ घटीकेहून जास्त (२ तास २४ मिनिटे) प्रदोषव्यापिनी अमावास्या मिळत आहे. १ नोव्हेंबर रोजी अमावास सायंकाळी ६।१७ पर्यंत आहे व सूर्यास्त सायंकाळी ५।५८ ला होत आहे. म्हणजे १ नोव्हेंबरला प्रदोषकाळ फक्त १९ मिनिटे मिळत आहे. तसे पाहता सुमारे ६०% महाराष्ट्रात दुसरे दिवशी प्रदोषकाळाला अमावास्या १ घटिकेहून कमी येत असल्याने दि. ३१ ऑक्टोबर रोजी श्रीलक्ष्मीपूजन करणे योग्य ठरेल. म्हणून आम्ही रुईकर पंचांगामध्ये विनांक ३१ ऑक्टोबर २०२४ ला श्रीलक्ष्मीपूजन विले आहे. कलकत्यामधून प्रसिद्ध होणारे इंडियन नॉटिकल अल्मनक (राष्ट्रीय पंचांग) हे भारत सरकारकडून प्रसिद्ध होते, त्यामध्ये श्रीलक्ष्मीपूजन गुरुवार दि. ३१/१०/२४ रोजी आहे.


आश्विन कृष्ण चतुर्वशी गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजीच श्रीलक्ष्मीपूजन करणे योग्य ठरेल.




श्रीलक्ष्मीपूजन मुहूर्त


आश्विन कृष्ण चतुर्दशी, गुरुवार दि. ३१ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ५।०४ ते रात्री ८।०५. प्रदोषकाल-उत्तमकाळ सायंकाळी ५।५८ ते ८।२२., निशिथकाल रात्री ११।३८ ते उत्तर रात्री २.


वहीपूजन मुहूर्त


कार्तिक शुक्ल प्रतिपदा, शनिवार दिनांक २ नोव्हेंबर २०२४. सकाळी ८/०५ ते ९१३५, सकाळी ११।०७ ते दुपारी १२।३६. दुपारी २।०५ ते ४/५२.


वही खरेदी, चोपडी मागवण्यास मुहूर्त ऑगस्ट :- दि. ९- सर्व दिवस, दि. १०- सर्व दिवस. दि. १४- सुपारी हुर


पर्यंत. दि. १८- सकाळी १०वसु, पर्यंत. दि. २३- सकाळी ११ नंतर, वि. २८- दुपारी १।३० पर्वतकाळी १०।१५ पर्यंत, तिर, दि. ३१- सायं. ७/३० पर्वत सप्टेंबर :- विपर्यंत. दि. ३०- सायं. ६ नंतर दिवस. वि. ६- दुपारी ३ दुपारी ऑक्टोबर : दि४- सर्व दिवस. वि. ५० सर्व विवर १० नंतर, दि. ११. १२ पर्यंत. वि. १६ - रात्री दिवस. वि. विसरुन सकाळी ७ नंतर वि. वि. २४- सर्व दिवस. दि. २९ सकळी ११/०४ ते द्वारी २/०३. दुपारी ३/३५ ते दुपारी १।१५ पर्यंत. विकी, ८।३० पर्यंतः पित. दि. २१- सर्व दिवस के ४/५०. सायं. ७।५८ ते रात्री १९।५५.

According to our opinion Shree Lakshmi Pujan can be performed on both the dates 31st October & 1st November this year but keep in mind the Muhurt is till 18.17 in the evening on 1st November.




18 views0 comments

Recent Posts

See All

अनुच्छिष्ट ध्यानाची कल्पना

अनुच्छिष्ट ध्यानाची कल्पना पुंडरीक : "परंतु आता जर तुझे 'हृदयपरिवर्तन' झाले असेल आणि तू माझ्या प्रेमासाठीच इथे आला असशील, तर मी जे जे...

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

Download PANDITJIPUNE

Download the “PANDITJIPUNE” app to easily stay updated on the go.

Scan QR code to join the app
Download on the App Store
Get it on Google Play
bottom of page
Locator
All locations
    https://manage.wix.com/catalog-feed/v1/feed.tsv?marketplace=google&version=1&token=L6pyf%2F%2BCAsNOB5TcfltUWwm29a2SdYssSfYd%2BVC1LUyXMYQdHORi5DDXy48%2BwmbI&productsOnly=false